आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या PHOTOSमधून झळकते मधुबालाचे अस्मानी सौंदर्य, पाहा 66 वर्षे जुने फोटोशूट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मधुबाला बॉलिवूडमधील अशी एक अभिनेत्री होती, जिच्या सौंदर्याची चर्चा देश-विदेशात व्हायची. व्हॅलेंटाईन डे अर्थातच 14 फेब्रुवारी 1933 रोजी दिल्लीतील एका मुस्लिम कुटुंबात तिचा जन्म झाला होता. आज तिची 84 वी जयंती आहे. मुमताज बेगम देहलवी उर्फ मधुबालाने 50 आणि 60 च्या दशकात हिंदी सिनेसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले होते. 'महल' (1949), 'मिस्टर अँड मिसेज 55' (1955), 'हावडा ब्रिज' (1958), 'चलती का नाम गाडी' (1958), 'मुगल-ए-आजम' (1960), 'हाफ टिकट' (1962) या कलाकृतींच्या माध्यमातून मधुबाला आजही आपल्यात आहे. 

66 वर्षांपूर्वी केले होते फोटोशूट... 
सध्याच्या काळात अभिनेत्रींचे हॉट फोटोशूट बघणे तसे चाहत्यांसाठी नित्यनेमाचेच झाले आहे. मात्र गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री मधुबाला हिनेसुद्धा आपल्या काळात एक ग्लॅमरस फोटोशूट केल्याचे तुम्हाला ठाऊक आहे का? जवळजवळ 50 ते 60च्या दशकात सौंदर्यसम्राज्ञी मधुबाला हिने एक ग्लॅमरस फोटोशूट केले होते. क्लासिक ब्युटी या नावाने प्रसिद्ध असलेल्या मधुबालाने त्याकाळी लाइफ मॅगझिनसाठी हे फोटोशूट केले होते. यासाठी एकाहून एक सुंदर पोज तिने दिल्या होत्या. या छायाचित्रांतून मधुबालाचे अस्मानी सौंदर्य झळकते. लाइफ मॅगझिनचे प्रसिद्ध फोटोग्राफर जेम्स बर्क यांनी 1951 मधुबालाचे सौंदर्य आपल्या कॅमे-यात कैद केले होते. 60 वर्षांहून अधिक काळ लोटला असला तरीदेखील या छायाचित्रांमध्ये कैद झालेले मधुबालाचे सौंदर्य कुणाचेही मन मोहून घेणारे आहे. साडी आणि टॉप-स्कर्टमध्ये मधुबालाने हे फोटोशूट केले होते. 

पुढील स्लाईड्सवर बघा, मधुबालाचे 66 वर्षांपूर्वीचे फोटोशूट... 

फोटो साभार: लाइफ मॅगझिन 
 
बातम्या आणखी आहेत...