आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'Anniv: ही आहे बॉलिवूडची पहिली अभिनेत्री, ड्रॅगन लेडी म्हणून होती प्रसिध्द

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(देविका रानी, डावीकडून पंडित नेहरू यांच्यासोबत, 'कर्मा'मध्ये हिमांशु राय यांच्यासोबत)
मुंबई- भारतीय सिनेसृष्टीची पहिली अभिनेत्री देविका रानी यांची आज आपल्यात असत्या तर त्यांचे वय 107 वर्षे असते. त्यांचा जन्म 30 मार्च 1908 रोजी विशाखापट्टनममध्ये झाला होता. देविका यांचे बालपण यूकेमध्ये गेले. तिथे त्या बोर्डिंग शाळेत शिक्षण घेत होत्या. देविका जशा बॉलिवूडच्या पहिल्या अभिनेत्री होत्या तसेच त्यांचे वडील कर्नल मन्मथा नाथ चौधरी मद्रास प्रेसिडेंसीचे पहिले भारतीय सर्जन होते. सिगारेट आणि दारूच्या आहारी गेल्याने आणि शॉर्ट टेम्पर असल्याने देविका यांना ड्रॅगल लेडी म्हणून ओळखले जात होते.
चला देविका यांच्या खासगी आयुष्याविषयी जाणून घेऊया...
सिनेमामध्ये पदार्पण-
देविका यांनी 1933मध्ये हिमांशु राय यांच्या प्रॉडक्शनमध्ये तयार झालेल्या 'कर्मा' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात हिमांशु मुख्य भूमिकेत होते. 'कर्मा' एका भारतीयव्दारा बनवलेला पहिला इंग्रजी टॉकी होता. एवढेच नव्हे, भारतातील पहिल्याच सिनेमात किसींग सीन देण्यात आला होता. विशेष म्हणजे, हिमांशु राय आणि देविका रानी यांनी दिलेल्या किसींग सीनचा वेळ 4 मिनीट होता, तो गेल्या 82 वर्षांपासून एक रेकॉर्ड आहे. हिमांशु यांच्याशी देविका यांची पहिली भेट 1928मध्ये झाली होती. त्यानंतर 1929मध्ये देविका यांनी हिमांशु यांच्या 'ए थ्रो ऑफ डाइस' या शॉर्ट फिल्ममध्ये कॉस्ट्युम डिझाइनर म्हणून काम केले होते.
हिमांशु राय यांच्यासोबत थाटला संसार-
1929मध्ये देविका रानी यांनी हिमांशु राय यांच्यासोबत लग्न केले. त्यानंतर दोघे जर्मनीमध्ये स्थायिक झाले. तिथे देविका बर्लिनमध्ये UFA स्टुडिओमध्ये सिनेमा निर्मितीचे काम शिकत होत्या. 'कर्मा' रिलीज झाल्यानंतर हिमांशु यांनी बॉम्बे टॉकीज नावाचे एक स्टुडिओ स्थापित केले आणि 5-6 वर्षांत अनेक सुपरहिट सिनेमे दिले. यामध्ये काही सिनेमांमध्ये देविका यांनी अभिनेत्री म्हणून काम केले. 1940मध्ये हिमांशु राय यांचे निधन झाले. देविका यांनी स्टुडिओचे जबाबदारी स्वत:च्या हातात घेतली. त्यानी अशोक कुमार आणि शशधर मुखर्जी यांच्यासोबत पार्टनरशिप करून सिनेमे निर्मित केले. मात्र त्यांचे सिनेमे अपयशी ठरले आणि देविका यांनी सिनेसृष्टी सोडण्याचा निर्णय घेतला.
पंडीत नेहरु यांच्या कुटुंबाशी होते चांगले नाते-
देविका आणि त्यांचे दुसरे पती स्वेतोस्लाव यांचे पंडीत नेहरु यांच्याशी चांगले नाते होते. 1945मध्ये देविका रानी यांनी रशियाचे पेंटर स्वेतोस्लाव रोएरिच यांच्याशी दुसरा विवाह केला. लग्नानंतर दोघे मनाली, हिमाचल प्रदेशात गेले होते. तेथेच त्यांची भेट जवाहरलाल नेहरु आणि त्यांच्या कुटुंबीयांशी झाली. नेहरु देविका यांचे मोठे चाहते होते, असे सांगितले जाते. मनालीमध्ये काही वर्षे घालवल्यानंतर देविका आणि त्यांचे पती स्वेतोस्लाव बंगळुरुमध्ये शिफ्ट झाले. तिथे त्यांनी स्वत:ची एक्सपोर्ट कंपनी सुरु केली. 9 मार्च 1994 रोजी भारतीय सिनेमाच्या या पहिल्या अभिनेत्री जगाचा निरोप घेतला.
पहिला दादासाहेब फाळके पुरस्कार-
1958मध्ये भारत सरकारने देविका रानी यांना पद्मश्रीने सन्मानित केले होते. शिवाय, भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात मोठा दादासाहेब फाळके पुरस्करानेसुध्दा (1969) त्यांना गौरविण्यात आले होते. 1990मध्ये देविकाला 'सेवियत लँड नेहरु अवॉर्ड' त्यांना सन्मानित करण्यात आले होते. फेब्रुवारी 2011मध्ये माहिती व प्रसारण मंत्रालय यांच्या आठवणीत त्यांना एक डाक तिकीटसुध्दा देण्यात आले होते.
अभिनयातील 10 वर्षे-
देविका यांनी 1933मध्ये 'कर्मा' म्हणून सिनेसृष्टीत पदार्पण केले होते. 1943मध्ये रिलीज झालेला 'हमारी बात' त्यांना अभिनेत्री म्हणून शेवटचा सिनेमा होता. 10 वर्षांच्या करिअरमध्ये देविका यांचे 'जवानी की हवा' (1935), 'ममता और मिया बीवी' (1936), 'जीवन नैया' (1936), 'सावित्री' (1937), 'वचन' (1938) आणि 'अनजान' (1941)सारखे सिनेमे आले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा देविका रानी यांच्या खासगी आयुष्यातील काही छायाचित्रे...