आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday Special: Famous Dialogues Of Prem Chopra

B'Day Spcl: 80 वर्षांचे झाले प्रेम चोप्रा, हे आहेत त्यांचे 10 Famous Dialogues

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः खलनायक हा दुष्ट व गुन्हेगारी प्रवृत्तीचा इसम असून कथानकामध्ये त्याची वाईट माणसाची भूमिका असते. भारतीय हिंदी सिनेसृष्टीत अभिनेते प्रेम चोप्रा अशाच खलनायकाच्या भूमिकांसाठी प्रसिद्ध आहेत. आज (23 सप्टेंबर) वयाची 80 वर्षे पूर्ण करणा-या प्रेम चोप्रा यांनी हिंदी आणि पंजाबी सिनेसृष्टीत मोलाचे योगदान दिले आहे. आपल्या फिल्मी करिअरमध्ये त्यांनी 300हून अधिक सिनेमांमध्ये अभिनय केला आहे. 23 सप्टेंबर 1935 रोजी लाहोर (पाकिस्तान) येथे एका पंजाबी कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांना अभिनयासोबतच डायलॉग डिलिव्हरीसाठी ओळखले जाते.
सिनेमाच्या इतिहासात त्यांचे असे अनेक डायलॉग्स आहेत, जे आजही सिनेरसिकांच्या ओठी रेंगाळतात. प्रसिद्ध अभिनेता राज कपूर यांचे मेव्हणे आणि अभिनेता शर्मन जोशी, विकास भल्ला यांचे सासरे असलेले प्रेम चोप्रा एकमेव असे कलाकार आहेत, ज्यांनी कपूर घराण्यातील सर्व पिढ्यांसोबत (पृथ्वीराज कपूर यांच्या पासून ते रणबीर कपूरपर्यंत) काम केले आहे.
आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला त्यांचे सुपरहिट डायलॉग्स सांगत आहोत...