आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...जेव्हा उशीरा आल्यावर व्ही. शांताराम यांचा राग झाला होता अनावर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- हेमा मालिनी आणि जितेंद्र)
मुंबई- बॉलिवूडमध्ये 70-80च्या दशकात 'जंपिंग जॅक' म्हणून ओळखले जाणारे अभिनेते जितेंद्र यांचा जन्म 7 एप्रिल 1942 रोजी अमृतसर येथील एका उद्योगपतीच्या घरी झाला. जितेंद्र यांचे मूळ नाव रवि कपूर होते. जवळपास 200 सिनेमांमध्ये काम केलेल्या जितेंद्र यांना सिनेमांत सर्वात पहिला ब्रेक व्ही. शांताराम यांनी दिला होता.
'गीत गाया पत्थरो ने' सिनेमांत पहिल्यांदाच जितेंद्र यांचा अभिनया पाहायला मिळाला. जितेंद्र यांच्या फिल्मी करिअरमध्ये राह, मेरे हुजूर, फर्ज, हमजोली, कारवा, धरमवीर, परिचय, खुशबू, तोहफा आणि हिम्मतवाला हे सिनेमे यशस्वी आणि अविस्मरणीय सिनेमांमध्ये सामील आहेत.
जेव्हा व्ही. शांताराम भडकले जितेंद्र यांच्यावर
'गीत गाया पत्थर'चे शूटिंग राजस्थानच्या बिकानेरनध्ये चालू होते. सिनेमाचे दिग्दर्शक व्ही. शांताराम वेळेचे बांधिल होते. त्यादरम्यान जितेंद्र यांच्यासोबत एक घडली. एकदा जितेंद्र यांना डिनरसाठी उशीर झाला. ते पाहून व्ही. शांताराम यांचा राग अनावर झाला. त्यांनी प्रॉडक्शन टीमला सांगून जितेंद्र यांना परत जाण्यास सांगितले. सोबतच मेकअपमॅनला दुस-या दिवशी जितेंद्र यांच्या चेह-यावर मेकअप न करण्याची ताकिद दिली.
दुस-या दिवशी जितेंद्र सकाळी पाच वाजता उठून मेकअपमॅनला मेकअप करण्यास सांगितला. परंतु मेकअपमॅनने त्यांचे ऐकले नाही. त्यावेळी जितेंद्र यांच्या डोळ्यात पाणी तरळले आणि ते व्ही. शांताराम यांच्या खोलीत गेले. व्ही शांताराम यांनी जितेंद्र यांना अशा परिस्थितीत पाहिल्यानंतर प्रभावित झाले.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा जितेंद्र यांच्या खासगी आयुष्यातील रंजक गोष्टी...