आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day:वयाच्या 17व्या वर्षी डेब्यू, लग्न, दोन मुले, घटस्फोट, Pics मध्ये बघा \'लोलो\'चे लाइफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आपल्या फॅमिलीसोबतचे करिश्माचे फोटोज - Divya Marathi
आपल्या फॅमिलीसोबतचे करिश्माचे फोटोज
मुंबई: बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आज (25 जून) 42 वर्षांची झाली आहे. 25 जून 1974 रोजी मुंबईत तिचा जन्म झाला. बॉलिवूडचे शो मॅन राजकपूर यांची ती नात आहे. तिचे वडील रणधीर कपूर आणि आई बबिता यांनीसुध्दा बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये बरेच नाव कमावले आहे. करिश्माला तिचे मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीय प्रेमाने 'लोलो' नावाने हाक मारतात.
वयाच्या 17 व्या वर्षी केले डेब्यू
करिश्माने वयाच्या 17व्या वर्षी बी टाऊनमध्ये एन्ट्री घेतली. 1991मध्ये दिग्दर्शक के. मुरलीमोहन राव यांच्या 'प्रेम कैदी'मधून तिने बॉलिवूड करिअरला सुरूवात केली. 1996च्या 'राजा हिंदुस्तानी' या सुपरहिट सिनेमासाठी तिला पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.
लग्न, दोन मुले आणि घटस्फोट
90च्या दशकात 'जिगर', 'राजा बाबू', 'सुहाग', 'कुली नं. 1', 'गोपी किशन', 'साजन चले ससुराल', 'जीत'सारखे अनेक सुपरस्टार सिनेमे करिश्माने बॉलिवूडला दिले. त्यानंतर तिने 2003मध्ये उद्योगपती संजय कपूरशी लग्न केले. मुलगी समायरा आणि मुलगा कियान ही दोन मुले त्यांना आहेत. अलीकडेच करिश्मा आणि तिचा नवरा संजय कायदेशीररित्या विभक्त झाले आहेत. गेल्याच आठवड्यात दोघांचा घटस्फोट घेतला. पोटगी म्हणून करिश्माला ती राहत असलेला डुप्लेक्स बंगलो, सोन्याचे दागिने आणि मुलांच्या नावी 10 कोटींची रक्कम मिळाली आहे. घटस्फोटानंतर दोन्ही मुलांचा ताबा करिश्माला मिळाला आहे.
कमबॅक ठरले फ्लॉप
दीर्घकाळ अभिनय क्षेत्रापासून दूर राहिलेल्या करिश्माने 2012मध्ये 'डेंजरस इश्क' सिनेमातून पुनरागमन केले. मात्र या सिनेमातून तिच्या पदरी अपयश पडले. सध्या ती विविध मॉडेलिंगच्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे.
करिश्माच्या वाढदिवसाचे औचित्य साधत बघा तिची बालपणीपासून ते आत्तापर्यंतचे खास PHOTOS.
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...