आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FACTS: खरे नाव आहे हरिकिशन, दिलीप कुमार यांच्यामुळे झाले मनोज कुमार

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- हिंदी सिनेसृष्टीतील महान कलाकारांपैकी एक मनोज कुमार 78 वर्षांचे झाले आहेत. मनोज कुमार यांचे मूळ नाव हरिकिशन हिरी गोस्वामी आहे. त्यांचा जन्म 24 जुलै 1937 रोजी पाकिस्तानच्या अबोटाबादमध्ये झाला. भारत-पाकिस्तानच्या फाळणीनंतर त्यांचे कुटुंबीय राजस्थानच्या हनुमानगढ जिल्ह्यात स्थायिक झाले. दिल्लीमधून पदवी शिक्षण घेतल्यानंतर अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन त्यांनी मुंबईच पाऊल ठेवले.
दिलीप कुमार यांच्यामुळे बदलले नाव-
हरिकिशन (मनोज कुमार) यांनी दिपील कुमार अभिनीत 'शबनम' सिनेमात छोटीशी भूमिका साकारली होती. सिनेमात दिलीप कुमार यांच्या भूमिकेचे नाव मनोज कुमार होते. हरिकिशन (मनोज कुमार) त्यांच्या भूमिकेने इतके प्रभावित झाले, की त्यांनी आपल्या स्वत:चे नाव बदलून मनोज कुमार ठेवले. अभिनेता म्हणून मनोज कुमार यांनी आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात 1957मध्ये रिलीज झालेल्या 'फॅशन' सिनेमातून केली. परंतु कमकुवत स्टोरी-लाइन आणि दिग्दर्शनामुळे सिनेमाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला नाही.
'हरियाली और रास्ता'ने चमकले नशीब-
1957 ते 1962पर्यंत मनोज कुमार फिल्म इंडस्ट्रीमध्ये नाव कमावण्यासाठी सतत संघर्ष करत राहिले. मनोज कुमार यांचे अभिनयाची करिअर 1962मध्ये आलेल्या विजय भट दिग्दर्शित 'हरियाली और रास्ता'या क्लासिक सिनेमाने घडवले. सिनेमात त्यांच्या नायिकेची भूमिका माला सिन्हाने साकारली होती. उत्कृष्ट संगीत आणि अभिनयाने सजलेल्या या सिनेमाच्या यश मनोज कुमार को-स्टारच्या रुपात स्थापित झाले.
चेहरा झाकण्याची अनोखी स्टाइल-
मनोज इंडस्ट्रीच्या अशा स्टार्समध्ये गणले जातात, ज्यांचे सर्वाधिक सिनेमे देशभक्तीवर आधारित आहेत. देशप्रेमी हीरोच्या भूमिकेत राहणारे मनोज कुमार आपल्या हाताने चेहरा झाकण्याच्या स्टाइलसाठी आजसुध्दा लोकप्रिय आहेत. 1992मध्ये भारत सरकारने त्यांना पद्मश्री पुरस्कारने सन्मानित केले. ते इंडस्ट्रीचे 1957 पासून 1995पर्यंतचे सक्रिय अभिनेते राहिले आहेत. त्यांच्या सिनेमांनी प्रभावित होऊन माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री यांनी 'जय जवान जय किसान' या ना-यावर सिनेमा बनवण्याचा आग्रह केला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, मनोज कुमार यांच्याशी निगडीत काही रंजक फॅक्ट्स...