आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'Anni: पाहा \'किंग ऑफ रोमान्स\' यश चोप्रांचे बॉलिवूड स्टार्ससोबतचे RARE PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचे किंग ऑफ रोमान्स यश चोप्रा यांची आज 84वी जयंती आहे. 'सिलसिला', 'दिलवाले दुल्हनिया लें जायेंगे' यांसारख्या अनेक अविस्मरणीय रोमँटिक सिनेमांची निर्मिती त्यांनी केली आहे. यश चोप्रा दारु आणि सिगारेटसारख्या व्यसनांपासून लांब होते. मात्र ते खवैय्ये होते. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक नजर टाकुया त्यांच्या प्रवासावर...

इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी जाणार होते लंडनला...
यश चोप्रा यांचा जन्म 27 सप्टेंबर 1932 रोजी लाहोरमध्ये झाला होता. येथेच त्यांचे शिक्षण झाले. 1945 मध्ये त्यांचे कुटुंब पंजाबमधील लुधियाना येथे स्थायिक झाले होते. इंजिनिअर होण्याचे यशजींचे स्वप्न होते. इंजिनिअरिंगच्या शिक्षणासाठी ते लंडनलासुद्धा जाणार होते. मात्र त्यांच्या नशीबात काही वेगळेच लिहिले होते. सिनेसृष्टीत करिअर करण्याचे स्वप्न उराशी बाळगून ते मुंबईत दाखल झाले होते.

1959 मध्ये पहिला सिनेमा केला दिग्दर्शित...
यश चोप्रा यांनी सहाय्यक दिग्दर्शकाच्या रुपात करिअरला सुरुवात केली होती. थोरले बंधू बी. आर चोप्रा आणि आय.एस. जोहर यांना ते असिस्ट करत होते. 1959 मध्ये 'धूल का फुल' या सिनेमाचे त्यांनी स्वतंत्रपणे दिग्दर्शन केले. त्यानंतर अनेक हिट सिनेमे त्यांनी दिग्दर्शित केले आणि 1973 मध्ये यशराज फिल्म्स या स्वतःच्या प्रॉडक्शन हाउसची त्यांनी स्थापना केली.

अनेक स्टार्सना बनवले सुपरस्टार...
यश चोप्रा यांनी आपल्या सिनेमातून अनेक तारे-तारकांना स्टारडम मिळवून दिले. 1975 मध्ये 'दीवार' या सिनेमाद्वारे अमिताभ बच्चन यांनी 'अँग्री यंग मॅन'ची उपाधी मिळाली. अमिताभ यांची प्रमुख भूमिका असलेले 'दीवार' (1975), 'कभी-कभी' (1976), 'त्रिशूल' (1978), 'काला पत्थर' (1979), 'सिलसिला' (1981) हे यश चोप्रांचे उत्कृष्ट सिनेमे आहेत. तर बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने यश चोप्रांसोबत 'डर', 'दिल तो पागल है', आणि 'वीर जारा' हे ब्लॉकबस्टर सिनेमे बनवले. यशजींचा शाहरुखसोबतचा 'जब तक है जान' हा शेवटचा सिनेमा होता.

रोमँटिक सिनेमांचे किमयागार...
यश चोप्रा यांना रोमँटिक सिनेमांचा किमयागार म्हटले जाते. 'जब तक है जान' हा त्यांचा शेवटचा सिनेमा होता. 2012 मध्ये 80व्या वाढदिवसाच्या वेळी त्यांनी म्हटले होते, की हा त्यांचा शेवटचा सिनेमा असून ते आता रिटायर होऊन आपल्या कुटुंबाला वेळ देऊ इच्छितात. यश चोप्रा रिटायर तर झाले, मात्र आपल्या कुटुंबाला वेळ देऊ शकले नाहीत. 21 ऑक्टोबर 2012 रोजी डेंग्यूमुळे त्यांचे निधन झाले.

यश चोप्रा यांचे कुटुंब...
यशजींच्या पत्नीचे नाव पामेला चोप्रा आहे. त्यांना दोन मुले असून आदित्य आणि उदय ही त्यांची नावे आहेत. त्यांचा थोरला मुलगा आदित्यसुद्धा दिग्दर्शक आणि निर्माता आहे. आदित्यचे अभिनेत्री राणी मुखर्जीसोबत लग्न झाले आहे. तर छोटा मुलगा उदय चोप्रा बॉलिवूड अभिनेता असून सिनेनिर्मिती क्षेत्रात त्याने पाऊल ठेवले आहे.

अनेक पुरस्कारांवर कोरले आपले नाव...
यश चोप्रा यांना 2001 मध्ये भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोच्च मानाचा समजला जाणारा दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. याशिवाय 2005मध्ये त्यांना पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले होते. सिनेमाच्या शूटिंगसाठी त्यांचे स्वित्झर्लंड हे आवडते ठिकाण होते. त्यांच्या अनेक सिनेमांचे चित्रिकरण येथे झाले होते. ऑक्टोबर 2010मध्ये स्वित्झर्लंडमध्येसुद्धा त्यांना सन्मानित करण्यात आले होते. याशिवाय येथे एका रस्त्याला त्यांचे नाव देण्यात आले असून एक ट्रेनसुद्धा त्यांच्या नावाने येथे चालवली जाते.

पुढील स्लाईड्समध्ये पाहा बॉलिवूड सेलिब्रिटींसोबतची यश चोप्रांची निवडक छायाचित्रे...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...