आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Birthday Special: Some Interesting Life Facts About Parveen Babi

महेश यांनी केला होता खुलासा, \'अमिताभ जीवे मारतील अशी परवीनला वाटायची भिती\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परवीन बाबी-अमिताभ बच्चन - Divya Marathi
परवीन बाबी-अमिताभ बच्चन
मुंबई: 4 एप्रिलला परवीन बाबी आज आपल्यात असती तर 67वा वाढदिवसा साजरा केला असता. 1949मध्ये जूनागढ, गुजरातमध्ये जन्मलेली परवीनचा 2005मध्ये रहस्यमयी अवस्थेत मृत्यू झाला. तिच्या आयुष्यात अनेक किस्से घडले, जे आजही अनेकांना ठाऊक नाहीये.
परवीनने बिग बींसोबत अनेक यशस्वी सिनेमे केले आहेत. परंतु ती नंतर त्यांना आपला शत्रु मानायला लागली होती. असे आम्ही नव्हे परवीनसोबत लिव्ह इनमध्ये राहिलेले दिग्दर्शक महेश भट्ट यांनी सांगितात. त्यांनी एका मासिकाच्या मुलाखतीत सांगितले होते.
महेश भट्ट यांनी उघड केले रहस्य...
2014मध्ये प्रतिष्ठीत मासिक फिल्मफेअरला दिलेल्या एका मुलाखतीत महेश भट्ट यांनी परवीनसोबतचे आपले नाते, प्रेम आणि त्यांच्या ब्रेकअपवर बातचीत केली होती. यावेळी त्यांनी परवीनचे आयुष्य आणि निधन यांविषयीसुध्दा त्यांनी अनेक रहस्य उघड केले होते. त्यांनी सांगितले होते, परवीनची मनासिक स्थिती बिघडली होती, की ती अमिताभ बच्चन यांनाच आपला शत्रु समजत होती. तिला वाटायचे, की अमिताभ तिले जीवे मारणार आहेत. परवीनच्या बर्थ अॅनिव्हर्सीनिमित्त divyamarathi.com तुम्हाला तिच्या आयुष्याविषयी काही रंजक गोष्टी सांगत आहे.
अमिताभ यांच्यावरसुध्दा लावले होते आरोप...
अनेक उपचार घेऊनदेखील परवीनवर त्याचा काहीच परिणाम झाला नाही. तिच्या मनात भीती होती, की कुणी तिला मारण्याचा प्रयत्न करत आहे. काही कालावधीनंतर परवीनला वाटत होते, की तिच्या कारमध्ये कुणी बॉम्ब ठेवला आहे. ती कोणत्याही आवाजाला घाबरायची.
एवढेच नाही तर, आपला को-स्टार अमिताभ बच्चन यांच्यावरसुध्दा तिने अनेकदा आरोप लावले आहेत. तिला वाटायचे बिग बी तिला मारणार आहेत. तिच्या अशा वागण्याने तिला नेहमी खोलीत बंद करून आणि माध्यमांपासून दूर ठेवावे लागत होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा परवीनच्या आयुष्यातील रंजक गोष्टी...