आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: आईला नावाने हाक मारायच्या वैजयंतीमाला, विवाहित राज कपूरसोबत होते अफेअर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गतकाळातील अभिनेत्री वैजयंतीमाला 79 वर्षांच्या झाल्या आहेत. त्यांचा जन्म 13 ऑगस्ट 1936 रोजी चेन्नई, तामिळनाडूमध्ये झाला. वैजयंती यांच्या आई वसुंधरा 40च्या दशकात तामिळ सिनेमांच्या प्रसिध्द अभिनेत्री होत्या. वैजयंतीमाला यांनी वयाच्या 13व्या वर्षीच सिनेमात एंट्री केली. 1949मध्ये तामिळ भाषेत आलेल्या 'Vazhkai' हा त्यांचा पहिला सिनेमा होता. सांगितले जाते, की नॅशनल स्टार बनलेल्या वैजयंतीमाला पहिल्या दाक्षिणात्य अभिनेत्री आहेत. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेऊन दाक्षिणात्या अभिनेत्री बॉलिवूडमध्ये पदार्पण करू लागल्या. अभिनेत्री होण्यासोबतच वैजयंती प्रसिध्द डान्सरसुध्दा आहेत. त्यांनी बॉलिवूडमध्ये सेमी-क्लासिक डान्सचा ट्रेंड रुजु केला. आपल्या डान्स नंबर्समुळे वैजयंती यांना 'टि्ंवकल टोज'च्या नावानेसुध्दा ओळखले जाते.
वयाच्या 15व्या वर्षी केली बॉलिवूडमध्ये एंट्री-
वैजयंतीमाला यांनी वयाच्या 15व्या वर्षी बॉलिवूडमध्ये एंट्री केली. 1951मध्ये आलेल्या 'आई बहार' सिनेमातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले. त्यानंतर 1954मध्ये त्यांनी 'नागिन' आणि 1955मध्ये 'देवदास' सिनेमात काम केले. 'देवदास'मध्ये वैजयंती यांनी चंद्रमुखीची भूमिका साकारली होती. त्यासाठी त्यांना आयुष्यात पहिलाच 'फिल्मफेअर अवॉर्ड' (उत्कृष्ट सहायक अभिनेत्री) मिळाला. मात्र त्यांनी हा पुरस्कार स्वीकारण्यात नकार दिला. वैजयंती यांच्या म्हणण्यानुसार, सिनेमात त्यांची भूमिका सहायक अभिनेत्रीची नव्हती. देवदासनंतर वैजयंती यांनी 'न्यू डेल्डी', 'नया दौर', 'आशा', 'साधना' आणि 'मधुमती'सारख्या सिनेमांत काम केले. 'साधना' आणि 'मधुमती'साठी त्यांना फिल्मफेअर उत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.
आई वयाने केवळ 16 वर्षे मोठी-
वैजयंतीमाला यांची आई वसुंधरा देवी त्यांच्यापेक्षा केवळ 16 वर्षांची मोठ्या होत्या. सांगितले जाते, की वैजयंतीमाला आपल्या आईला नावाने हाक मारत होत्या. 1961मध्ये 'गंगा जमुना'च्या सेटवर त्यांचे अफेअर दिलीप कुमारसोबत सुरु झाले होते. त्यापूर्वी दिलीप कुमार मधुबाला आणि कामिनी कौशलसोबत रिलेशनशिपमध्ये होते. 60च्या दशकातच वैजयंती यांचे नाव 'शो मॅन' नावाने प्रसिध्द राज कपूर यांच्यासोबतसुध्दा जुळले होते. दोघांचे नाते लग्नापर्यंत पोहोचले. विशेष म्हणजे, विवाहित होते आणि त्यांना मुलेदेखील होती. वैजयंती यांच्यासोबतच्या अफेअरमुळे राज कपूर यांची पत्नी कृष्णा राज यांनी मुलांसोबत घर सोडले होते. त्या जवळपास चार महिने मुंबईच्या नटराज हॉटेलमध्ये राहिल्या होत्या.
1968मध्ये थाटला संसार-
1968मध्ये वैजयंतीमाला यांनी चमनलाल बालीसोबत लग्न केले. त्यांना एक मुलगासुध्दा आहे, त्याचे नाव सुचिंद्रा बाली आहे.
राजकिय क्षेत्रातसुध्दा सक्रिय-
1984मध्ये वैजयंतीमाला यांनी काँग्रेसच्या तिकिटावर चेन्नई मतदारसंघात तामिळनाडूच्या सार्वत्रिक निवडणूकीत सहभाग घेऊन विजय मिळवला होता. यादरम्यान त्यांना 52.9% (313, 848) मते मिळाली होती. भाजपच्या इरा सेजियान यांना पराभव केला. 1989मध्येसुध्दा त्यांनी तामिळनाडू सार्वत्रिक निवडणूकीत विजय मिळवला. 1993मध्ये राज्यसभा सदस्यच्या रुपात पुढे करण्यात आले आणि 1999मध्ये त्यांनी काँग्रेसला राजिनामा दिला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, वैजयंतीमाला यांचे बालपणीपासून ते आतापर्यंतचे फोटो...