आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Blast from the past: पाहा सेलिब्रिटींचे असे क्षण जे तुम्ही यापूर्वी कधीही बघितले नाहीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः जगभरातील सर्वात मोठ्या फिल्म इंडस्ट्रीपैकी बॉलिवूड एक आहे. येथे वर्षाला बाराशेपेक्षा जास्त कलाकृती तयार केल्या जातात. प्रेक्षक बॉलिवूडमधील आपल्या आवडत्या कलाकारांच्या खासगी आयुष्याबद्दल जाणून घेण्यास नेहमीच उत्सुक असतात. त्याचप्रमाणे त्यांची छायाचित्रे बघायलाही त्यांना आवडतं.

खरं तर रुपेरी पडद्यावर सेलिब्रिटी काही वेगळे दिसतात. त्यांचे वागणेही वेगळे असते. मात्र, वैयक्तिक आयुष्यात तुम्ही-आम्ही जसे राहतो, तसेच हे सेलिब्रिटी जीवन व्यतीत करीत असतात. यात कॅमेऱ्याला गृहित धरून संवाद फेक केली जात नाही. सेलिब्रिटी तुमच्या आमच्यासारखे खरोखरी सर्वसामान्य नागरिक असतात. येथे अनेक जण एकमेकांचे बेस्ट फ्रेंड्स आहेत. सामान्यांप्रमाणेच हे सेलिब्रिटीसुद्धा आपल्या मित्रमैत्रिणींमध्ये रमतात. 'करण अर्जुन'च्या सेटवर शाहरुख आणि सलमानची बाँडिंग, करीना कपूर, राणी मुखर्जी आणि हृतिक रोशन एकत्र निवांत क्षणी वेळ घालवतानाची छायाचित्रे कदाचितच त्यांच्या चाहत्यांच्या कधी बघण्यात आली असावीत.

या सेलिब्रिटींसह अनेकांचे असेच खास क्षण आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत. ही छायाचित्र बघून या सेलिब्रिटींच्या चेह-यावरसुद्धा स्मितहास्य फुलेल आणि ते नक्की आपल्या भूतकाळात हरवतील.

पुढील स्लाईड्समध्ये बघा तुमच्या आवडत्या कलाकारांचे खास क्षण...
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...