आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • BLAST FROM THE PAST: When Deepika Padukone Was A Kingfisher Model

Blast From The Past : बॉक्स ऑफिसवर 'तमाशा' करणारी दीपिका होती किंगफिशर मॉडेल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री असलेल्या दीपिका पदुकोणचा 'तमाशा' हा सिनेमा आज (शुक्रवारी) बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. या सिनेमात ती तिचा एक्स बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत स्क्रिन स्पेस शेअर करताना दिसणार आहे. रणबीर आणि दीपिका ही जोडी यापूर्वी 'बचना ए हसीनो' आणि 'ये जवानी है दिवानी' या सिनेमांमध्ये एकत्र झळकली होती. दीपिकाचे मागील रिलीज झालेले सर्वच सिनेमे बॉक्स ऑफिसवर चांगले गाजले. मात्र रणबीरचे सिनेमे एकामागून एक बॉक्स ऑफिसवर आपटले आहेत. त्यामुळे आता रणबीरला दीपिकाची साथ लकी ठरते का? हे लवकरच स्पष्ट होणारेय.
दीपिका बी टाऊनची आघाडीची अभिनेत्री आहे, यात दुमत नाही. मात्र बॉलिवूड अभिनेत्री होण्याच्या अगोदर थी एक टॉप मॉडेल होती, हे तुम्हाला ठाऊक आहे का... दीपिका आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात किंगफिशर कॅलेंडरची मॉडेल होती.
रंजक गोष्ट अशी, की ती बॉलिवूड अभिनेत्री झाल्यानंतर किंगफिशर किंग विजय माल्याचा मुलगा सिध्दार्थ माल्यासोबत डेटींग करत होती. खरं तर दीपिकाला अभिनेत्री बनण्यात काही रुची नव्हती. परंतु महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना आलेल्या मॉडेलिंगच्या ऑफर्स तिने स्वीकारल्या. छंद म्हणून मॉडेलिंग करणा-या दीपिकाची कालांतराने या क्षेत्रात रुची निर्माण झाली आणि ती अनेक जाहिरातीत झळकली.
मॉडेलिंगच्या काळात तिने किंगफिशरसाठी अनेक हॉट फोटोशूट्स केले आहेत. तिच्या बिकिनी फोटोशूट्सची विशेष चर्चा सुद्धा झाली आहे.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दाखवत आहोत, दीपिकाच्या मॉडेलिंगच्या काळातील काही खास छायाचित्रे...