आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Remembrance: सदाशिव नव्हे गणेश कुमार नरवोडे होते खरे नाव, अंत्यसंस्काराला उसळली होती गर्दी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः सदाशिव अमरापुरकर यांच्या प्रतिमेजवळ उभ्या त्यांच्या पत्नी आणि मुलगी - Divya Marathi
फाइल फोटोः सदाशिव अमरापुरकर यांच्या प्रतिमेजवळ उभ्या त्यांच्या पत्नी आणि मुलगी

मुंबईः प्रसिद्ध सिनेअभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचा आज (3 नोव्हेंबर) प्रथम स्मृतीदिन आहे. 3 नोव्हेंबर 2014 रोजी फुफ्फुसात जंतुसंसर्ग झाल्याने वयाच्या 64 व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली होती.
11 मे 1950 रोजी एका ब्राम्हण कुटुंबात अहमदनगर येथे त्यांचा झाला होता. त्यांचे खरे नाव गणेश कुमार नरवोडे असे होते. 1974 साली त्यांनी रंगभूमीवरुन आपल्या अभिनयाची कारकीर्द सुरु केली. नाटकातून कामाला सुरुवात केल्यावर त्यांनी सदाशिव हे नाव धारण केले. 'तात्या' या नावानेसुद्धा ते सिनेसृष्टीत प्रसिद्ध होते. तीनशेहून अधिक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारे सदाशिव अमरापूरकर यांची गायक होण्याची इच्छा होती. मात्र अनुनासिक आवाज असल्यामुळे ते गायकीत जम बसवू शकले नव्हते.
मुंबईत नव्हे मुळगावी झाले होते अंत्यसंस्कार
सदाशिव अमरापुरकर यांच्या पार्थिवावर त्यांच्या मुळगावी म्हणजे अहमदनगर येथे अंत्यसंस्कार करण्यात आले होते. तत्पूर्वी मुंबईत त्यांचे अंत्यदर्शन ठेवण्यात आले होते. निवेदिता सराफ, रिमा लागू यांच्यासह अनेक मराठी कलावंतांनी आपल्या लाडक्या कलाकाराचे अंत्यदर्शन घेऊन श्रद्धांजली वाहिली होती. तर अहमदनगरमध्ये त्यांना अखेरचा निरोप द्यायला हजारोच्या संख्येत लोक आले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, सदाशिव अमरापूरकर यांच्या अंत्य यात्रेची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...