आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री होण्यापूर्वी न्यूज रिडर होती स्मिता, निधनानंतर रिलीज झाले 14 सिनेमे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्मिता पाटील
हिंदी सिनेसृष्टीत जेव्हा कधी आर्ट कलाकारांविषयी बोलले जाते, तेव्हा-तेव्हा स्मिता पाटील या अभिनेत्रीच्या नावाचा उल्लेख होतो. 17 ऑक्टोबर 1955मध्ये पुण्यात जन्मलेल्या स्मिताने 13 डिसेंबर 1986ला जगाचा अलविदा म्हटले. वयाच्या 31व्या स्मिताने अखेरचा श्वास घेतला. आज जर स्मिता आपल्यात असतील तर 60 वर्षांची झाली असती.
स्मिताचे करिअर खूप कमी होते, परंतु यात कालावधीत ती बरीच लोकप्रिय झाली होती. काही वर्षांच्या करिअरमध्ये तिने खूप नाव कमावले. तिने सिनेसृष्टीला मंथन (1977), भूमिका (1977), आक्रोश (1980), बाजार (1982), नमक हलाल (1982), अर्थ (1982), मंडी (1983), मिर्च मसाला (1985)सारखे अनेक सुपरहिट सिनेमे दिले.
स्मिताच्या 29व्या डेथ अॅनिव्हर्सरीनिमित्त divyamarathi.com तुम्हाला सांगत आहे तिच्या आयुष्याशी निगडीत काही Facts...
अभिनेत्री होण्यापूर्वी होती न्यूज रिडर-
बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने लोकांच्या मनावर राज्य करणारी स्मिता पाटील सिनेमांत येण्यापूर्वी एक न्यूज रीडर होती. इतकेच नव्हे तिने फोटोग्राफीमध्येसुध्दा नाव कमावले होते.
मृत्यूनंतर रिलीज झाले 14 सिनेमे-
तिने जवळपास 14 सिनेमे तिच्या निधनानंतर रिलीज झाले. त्यामध्ये 'मिर्च मसाला', 'डांस-डांस', 'ठिकाना', 'सूत्रधार', 'इंसानियत के दुश्मन', 'अहसान', 'राही', नजराना', 'आवाम', 'शेर शिवाजी', 'वारिस', 'हम फरिश्ते नही', 'आकर्षण' आणि 'गलियो के बादशाह' हे सिनेमे सामील आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या स्मिताच्या आयुष्यातील रंजक आणि ठाऊक नसलेल्या गोष्टी...