आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चटका लावणारा होता या सेलिब्रिटींचा मृत्यू, शेवटची छायाचित्रे बघून पाणावतील तुमचे डोळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सेलिब्रिटी आयुष्यभर प्रेक्षकांचे मनोरंजन करतात आणि आयुष्याचा निरोप घेताना सर्वांना रडवून जातात. नेहमी चर्चेत राहणा-या सेलिब्रिटींचा मृत्यू प्रेक्षकांना चटका लावून जातो. असेच एक अभिनेते म्हणजे विनोद खन्ना. बॉलिवूडचे देखणे हीरो म्हणून विनोद खन्ना यांना ओळखले जात असे. याचवर्षी एप्रिल महिन्यात कॅन्सरमुळे विनोद खन्ना यांचे निधन झाले. मृत्यूसमयी ते 70 वर्षांचे होते. आज (6 ऑक्टोबर) त्यांचा वाढदिवस आहे. 6 ऑक्टोबर 1946 मध्ये पेशावर येथे त्यांचा जन्म झाला होता. 
 
विनोद खन्ना यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली होती. चित्रपटांच्या माध्यमातून ते कायम आपल्या चाहत्यांमध्ये राहणार आहेत. विनोद खन्ना यांच्यासह बॉलिवूडमधील असे अनेक सेलिब्रिटी आहेत, जे या जगातून कायमचे निघून गेले आहेत, मात्र आपल्या कलाकृतींच्या माध्यमातून ते आपल्यात आहेत. अशाच काही नावाजलेल्या सेलिब्रिटींची त्यांच्या निधनाच्या काही क्षणानंतर क्लिक झालेली छायाचित्रे येथे तुम्हाला बघता येणार आहेत. ही छायाचित्रे बघून नक्कीच या सेलिब्रिटींच्या चाहत्यांचे डाळे पाणावल्याशिवाय राहणार नाहीत.
बातम्या आणखी आहेत...