आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bollywood, Hollywood, Marathi Celebs Death And Injured In Car Accident

हेमामालिनीच नव्हे या सेलेब्सचाही झालाय कार अपघात, काही बचावले तर काहींचा झाला मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्रांमध्ये कार अपघाताला सामोरे गेलेले सेलिब्रिटी)
अभिनेत्री हेमा मालिनी यांच्या गाडीचा गुरुवारी अपघात झाला. या अपघातात त्या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर प्लास्टिक सर्जरी करण्‍यात आली आहे. फोर्टिस हॉस्पिटलमध्ये हेमा यांच्यावर उपचार सुरु आहेत. जयपूरजवळ दौसा येथे झालेल्या या अपघातात एका लहान मुलीचा मृत्यू झाला आहे. तसेच चार जण जखमी झाले आहेत.
शुक्रवारी सकाळी हेमा मालिनी यांच्या कार चालकाला ओव्हस्पीड ड्रायव्हींगच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. हेमा मालिनी त्यांच्या मर्सिडीझ कारमध्ये मेहंदीपूर बालाजीचे दर्शन घेऊन मथुरेला जात होत्या. त्यावेळी जयपूर-आग्रा हायवेवर दौसा येथे समोरून येणाऱ्या अल्टो कारबरोबर त्यांच्या गाडीची जोरदार धडक झाली. त्यात दोन्ही गाड्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
भारतात रस्ता अपघातांचे प्रमाण खूप मोठे आहे. केवळ हिंदीच नव्हे तर मराठी आणि हॉलिवूड सेलिब्रेटी आहेत ज्यांना कार अपघाताला सामोरे जावे लागले होते. त्यात काहीजण बचावले तर काहींचा दुर्दैवी मृत्यू झाला.
जाणून घेऊया, अशाच काही सेलिब्रिटींविषयी...