एन्टरटेन्मेंट डेस्कः बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशन 10 जानेवारी रोजी वयाची 43 वर्षे पूर्ण करणार आहे. 10 जानेवारी 1974 रोजी जन्मलेला हृतिक गेल्या काही दिवसांपासून सिनेमांपेक्षा
आपल्या खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत राहिला आहे. पत्नी सुझानपासून हृतिक आता कायमचा विभक्त झाला आहे. ऑक्टोबर 2014 मध्ये दोघांनी कायदेशीररित्या घटस्फोट घेऊन आपले वैवाहिक आयुष्य संपुष्टात आणले. एक काळ असा होता, जेव्हा हृतिक आणि सुझानची बॉलिवूडच्या सर्वात फेमस आणि पॉप्युलर कपल्समध्ये गणना व्हायची.
या जोड्यांनीही घेतला आहे घटस्फोट...
हृतिक आणि सुझान यांच्याप्रमाणेच बॉलिवूडमध्ये असे अनेक प्रसिद्ध सेलिब्रिटी आहेत, ज्यांनी घटस्फोट घेऊन आपल्या जोडीदारापासून विभक्त होणे पसंत केले. यामध्ये आमिर खान-रीना, सैफ अली खान-अमृता सिंह, संजय दत्त-रीया, कमल हासन-सारिका, संगीता बिजलानी-अझहरुद्दीन, अनुराग कश्यप-कल्कि कोचलिन, ज्योती रंधावा-चित्रांगदा सिंह आणि रणवीर शौरी-कोंकणा सेन शर्मा या सेलिब्रिटींच्या नावाचा समावेश आहे.
13 वर्षे चालले हृतिक-सुझानचे लग्न
हृतिक आणि सुझानने तब्बल 13 वर्षे एकमेकांची साथ निभावली. त्यांना हृहान आणि हृदान ही दोन मुले आहेत. विशेष म्हणजे 2000 साली या दोघांनी लव्ह मॅरेज केले होते. या जोडीची गणना बी टाऊनच्या रोमँटिक कपल्समध्ये केली जायची. रंजक बाब म्हणजे हृतिक यशोशिखरावर असताना त्याने लग्न करुन आपल्या चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, आणखी अशा काही जोड्यांविषयी ज्यांनी प्रेमविवाह केला खरा, मात्र घटस्फोटावर त्यांच्या नात्याच्या अंत झाला...