आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS : 1951 मध्ये तरुणींना अशी द्यावी लागायची फिल्मसाठी Screen Test

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - आधी मायानगरी आणि आता बॉलिवूड. देभरातून अनेकजण याठिकाणी नशीब आजमावण्यासाठी येत असतात. पण त्यापैकी काही मोजक्या लोकांनाच ती स्वप्ने पूर्ण करण्यात यश मिळत असते. 50-60च्या दशकातसुद्धा अनेक तरुणी अभिनेत्री व्हायचे स्वप्न उराशी घेऊन या मायानगरीत यायच्या. पण प्रत्येकाची स्वप्ने पूर्ण होईलच असे नाही. कारण हा मार्ग वाटतो तेवढा सोपा नाही.

फोटो जर्नलिस्ट 'जेम्स बुरके' यांनी क्लिक केले फोटो...
आज आम्ही आपल्याला 1951 मधील असेच काही फोटो दाखवणार आहोत. या फोटोमधून त्याकाळात बॉलिवूडमध्ये ऑडिशन कशाप्रकारे घेतले जात होते, याची कल्पना येते. हे फोटो Life Magazine चे फोटो जर्नालिस्ट 'जेम्स बुरके' याने टिपले होते. डायरेक्टर अब्दुल राशीद करदार यांनी त्यांच्या एका चित्रपटासाठी दोन मुलींचे ऑडिशन घेतले होते. या छायाचित्रांवरुन हे लक्षात येतं, की या दोन्ही तरुणी आधी साडी नेसून आल्या नंतर दिग्दर्शकासमोर साडी सोडली. त्यांच्या चालण्याची स्क्रिन टेस्ट दिग्दर्शकाने घेतली होती.

अब्दुल राशीद करदार यांनी 'शहाजहां' (1946), 'दिल्लगी' (1949), 'दुलारी' (1949) आणि 'दिल दिया दर्द लिया' (1966) अशा चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

अब्दुल राशिद करदार : एक नजर
- अब्दुल राशिद करदार यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 मध्ये लाहोर येथे झाला होता. त्यांना ए.आर. करदार या नावाने ओळखळे जायचे.

- त्यांचे उपनाव मियांजी होते. करदार यांना लाहोप चित्रपट उद्योगाचे जनक म्हणून ओळखले जाते. फाळणीनंतर ते भारतात आले आणि मुंबईत स्थायिक झाले.

- करदार यांनी आपल्या प्रॉडक्शनमध्ये 40 ते 60 च्या दशकात अनेक अविस्मरणीय सिनेमे बनवले.

- 1928 मध्ये करदार यांनी 'डॉटर्स ऑफ टुडे' आणि 1929 मध्ये 'हीर रांझा'मध्ये अभिनयसुद्धा केला होता. दिग्दर्शक म्हणून 'हुस्न का डाकू' हा त्यांचा पहिला सिनेमा होता. 1929 मध्ये हा सिनेमा रिलीज झाला होता.

- करदार यांनी भारतीय सिनेसृष्टीत अनेक कलाकारांना इंट्रोड्युस केले. यामध्ये नौशाद, मजरुह सुल्तानपुरी आणि सुरैया या नावांचा समावेश आहे.

- इंडस्ट्रीचे प्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांना करदार यांनी 'दुलारी' या सिनेमातील 'सुहानी रात ढल चुकी' हे गाणे गाण्याची संधी दिली होती.

पुढील स्लाइड्सवर पाहा, 50-60 च्या दशकात कसे चालायचे ऑडिशन...

(सर्व फोटो साभार : लाइफ मॅगझिन)


(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...