बॉलिवूडमध्ये अनेक अभिनेत्री आहेत, ज्यांनी करिअरच्या सुरुवातीला स्टारडम, प्रसिध्दी, पैसा मिळवला. परंतु अखेरच्या काळात त्या अज्ञातवासात गेल्या. यामध्ये अभिनेत्री परवीन बाबीचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. परवीन बाबीची आज 67वी बर्थ अॅनिव्हर्सरी आहे. 4 एप्रिल 1949ला जन्मलेल्या परवीनने अनेक सुपरहिट सिनेमांत काम केले. परंतु परवीनने आयुष्यातील शेवटचे दिवस एकांतातच घालवले. तिचे मानसिक संतुलन बिघडले होते. परवीनशिवाय अनेक बॉलिवूड स्टार्स आहेत, जे आयुष्याच्या शेवटच्या क्षणी एकटे राहिले आणि अज्ञातवासात आयुष्य घालवत आहेत.
सुलक्षणा पंडित...
सुलक्षणा पंडित अभिनेत्रीसोबत गायिकासुध्दा आहे. 70च्या दशकात त्यांनी अनेक हिट सिनेमांत काम केले. सुलक्षणा संजीव कुमाप यांच्यावर जीवापाड प्रेम करत होत्या. परंतु संजीव यांनी सुलक्षणा यांच्या प्रेमाचा प्रस्ताव नाकारला. संजीव कुमार यांच्या अकाली निधनाने सुलक्षणा यांचे मानसिक संतुलन बिघडले होते. त्यांना सिनेमे मिळणे बंद झाले होते आणि गायनातूनही त्यांनी काढता पाय घेतला. आज त्या अज्ञातवासात आयुष्य जगत आहेत. त्यांचे मानसिक संतुलन ठिक नसल्याने त्या कुणालाच ओळखू शकत नाहीत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, अशाच काही कलाकारांविषयी...