आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही होती भारतातील पहिल्या बोलपटाची अभिनेत्री, पाहा इतर स्टार्सचेही PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : जुबैदा बेगम, उजवीकडे 'आलम आरा' सिनेमाच्या एका सीनमध्ये मास्टर विठ्ठलसोबत
मुंबई- पृथ्वीराज कपूरला हिंदी फिल्म इंडस्ट्री आणि भारतीय थिएटरच्या पायनिअरच्या रुपात ओळखले जाते. 3 नोव्हेंबर 1901ला ल्यालपूर, ब्रिटीश इंडिया (आता पंजाब, पाकिस्तान)मध्ये जन्मलेले पृथ्वीराज 1928ला मुंबईला आले होते. त्यांनी इम्पीरिअल फिल्म कंपनी ज्वॉइन केली. 1929मध्ये त्यांनी मुख्य अभिनेता म्हणून फिल्म इंडस्ट्रीमध्ये एंट्री केली. हा 'सिनेमा गर्ल' नावाचा सिनेमा होता. मात्र पृथ्वीराज यांना सर्वात भारताच्या पहिल्या बोलपट 'आलम आरा' सिनेमासाठी ओळखले जाते. या सिनेमात ते मुख्य अभिनेते नव्हते, त्यांनी सहायक कलाकाराची भूमिका केली होती.
कोण-कोण होते या सिनेमात-
'आलम आरा'मध्ये मास्टर विठ्ठल, जुवैदा, जिल्लो, सुशीला आणि पृथ्वीराज कपूर यांनी भूमिका साकारल्या होत्या. सिनेमाची कहाणी जोसेफ डेव्हिडने लिहिली होती, तसेच याचे दिग्दर्शन अर्देशिर ईराणीने लिहिली होती. 124 मिनीटांचा हा सिनेमाला इम्पीरिअल मूव्हीटोन नावाची प्रॉडक्शन कंपनीने निर्मित केला होता.
सिनेमात होती 7 गाणी-
पहिला बोलपट सिनेमातून संगीताला उत्तम स्थान मिळाले. 'आलम आरा'मध्ये 7 गाणे होते आणि याच सिनेमाचे 'दे दे खुदा के नाम पे' भारतीय सिनेमाचे पहिले गाणे मानले जाते. हे गाणे वजीर मोहम्मद खानने गायले होते. 'बदला दिलवाएगा या रब..., 'रूठा है आसमान...', 'तेरी कातिल निगाहों ने मारा...', 'दे दिल को आराम...', 'भर भर के जाम पिला जा...', और 'दरस बिना मारे है...' सिनेमाची ही इतर गाणी आहेत.
पहिल्याच सिनेमापासून विकायला लागले होते ब्लॅकमध्ये तिकीट-
14 मार्च 1931ला 'आलम आरा' मुंबईच्या 'मॅजेस्टिक' सिनेमात लागला होता. पहिल्या दिवशी, पहिल्या शोच्या तिकीटासाठी सिनेमा हॉल बाहेर मोठी गर्दी जमली होती. या प्रकरणाला सांभाळण्यासाठी पोलिसांनासुध्दा बोलवावे लागले होते. जे तिकीट चार आण्यात मिळत होते, त्याला लोकांनी ब्लॅकमध्ये 5 रुपयांत खरेदी केले. सांगितले जाते, ब्लॅक मार्केटिंग भारतीय सिनेमाच्या पहिल्या बोलपटापासून सुरु झाली होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिनेमाचे दिग्दर्शक आणि इकर अभिनेते आणि गायक...