आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Celebrities Like Smita Patil And Many More Who Died At Early Age

वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी स्मिताने घेतला जगाचा निरोप, कमी वयात या कलाकारांचे झाले निधन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटोः स्मिता पाटील - Divya Marathi
फाइल फोटोः स्मिता पाटील

मुंबईः हिंदी सिनेसृष्टीत कलात्मक सिनेमांचा विषय निघल्यानंतर स्मिता पाटील आणि शबाना आझमी या अभिनेत्रींच्या नावाचा उल्लेख सर्वप्रथम होतो. स्मिता पाटील यांचे फिल्मी करिअर खूप छोटे होते. मात्र या काळात त्यांनी अनेक उत्कृष्ट सिनेमे दिले. आज स्मिता पाटील यांची 60 वी जयंती आहे. 17 ऑक्टोबर 1955 रोजी जन्मलेल्या स्मिता पाटील यांनी वयाच्या अवघ्या 31 व्या वर्षी या जगाचा निरोप घेतला.
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्युटमधून पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी काही वर्षे दुरदर्शनवर न्यूज रिडर म्हणून काम केले होते. याचकाळात दिग्दर्शक श्याम बेनेगल यांची नजर त्यांच्यावर पडली आणि त्यांनी स्मिता यांना आपल्या 'चरणदास' या सिनेमासाठी साइन केले. 1975 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाद्वारे स्मिता यांनी सिनेसृष्टीत पदार्पण केले. स्मिता पाटील यांचे निधन त्यांच्या कुटुंबीयांबरोबरच बॉलिवूडसाठीही कधीही न भरुन निघणारी पोकळी होती.
स्मिता पाटील यांचे खासगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले. राज बब्बर यांच्यासोबत लग्न केल्यानंतर त्यांच्यावर घर तोडण्याचा आरोप लावण्यात आला. मीडियातसुद्धा त्यांच्यावर बरीच टीका झाली होती. 1986 मध्ये मुलगा प्रतिक बब्बरला जन्म दिला. मात्र मुलाच्या जन्मानंतर दोन आठवड्यांतच त्यांचे निधन झाले.
1975 ते 1985 या दहा वर्षांत स्मिता पाटील हिंदी सिनेसृष्टीतील मोठे नाव बनले होते. मंथन (1977), भूमिका (1977), आक्रोश (1980), बाजार (1982), नमक हलाल (1982), अर्थ (1982), मंडी (1983), मिर्च मसाला (1985) यांसारखे अविस्मरणीय सिनेमे त्यांनी दिले. हिंदीसह मराठी, पंजाबी आणि मल्याळम सिनेमांमध्ये त्यांनी काम केले.
स्मिता पाटील, संजीव कुमार आणि मधुबाला यांच्यासारखे असे अनेक कलाकार आहेत, ज्यांनी कमी वयातच या जगाचा निरोप घेतला.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या या कलाकारांविषयी...