आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गीता बालीसह या 5 सेलेब्सचा आजाराने झाला अकाली मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(गीता बाली) - Divya Marathi
(गीता बाली)
गीता बाली गतकाळातील प्रसिध्द अभिनेत्री होती. तिचा जन्म 1930मध्ये झाला होता. तिने वयाच्या 12व्या वर्षीच फिल्मी करिअरची सुरुवात केली होती आणि 1950च्या दशकात ती एक स्टार बनली होती. मात्र वयाच्या 35व्या वर्षी आजाराने गीताचे निधन झाले. आज (21 जानेवारी) तिची 51वी पुण्यतिथी आहे. मधुबाला, संदीप आचार्य, स्मिता पाटीलसह अनेक स्टार्स आहेत, ज्यांचे कोणत्या ना कोणत्या आजाराने निधन झाले.

गीता: शम्मी कपूर यांच्याशी लग्न...
1955मध्ये गीता बाली आणि शम्मी कपूर यांनी कुटुंबीयांचे परवानगी न घेताच लग्न केले. गीता शम्मी कपूर यांना भेटण्यापूर्वी पृथ्वीराज कपूर आणि राज कपूरसोबत काम करत होती. राज कपूरसोबत तिने 'बावरे नैना' आणि पृथ्वीराज कपूरसोबत 'आनंदमठ' सिनेमा काम केले होते. कपूर कुटुंबात नियम होता, की त्यांच्या घरातील मुली आणि सूना सिनेमांत काम करणार नाहीत. परंतु गीता यांनी लग्नानंतरसुध्दा सिनेमांत काम करणे सोडले नाही. तिची 1963मध्ये आलेला 'जब से तुमको देखा है' हा शेवटचा सिनेमा होता.
आजारपणामुळे झाले निधन...
1965मध्ये कांजण्यामुळे गीता बालीचे अकाली मृत्यू झाला. यादरम्यान ती एका पंजाबी सिनेमात काम करत होती. त्याचवेळी तिला हा आजार जडला होता.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या अशाच सेलेब्सविषयी, ज्यांचे आजाराने झाले निधन...