आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नर्गिसचा कॅन्सरमुळे, तर या 10 Celebsचा या आजारांनी झाला अकाली मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस दत्त यांची आज 86 वा जन्मदिवस आहे. 1 जून 1929 रोजी कोलकाता येथे त्यांचा जन्म झाला होता. 34 वर्षांपूर्वी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. वयाच्या 51 व्या वर्षी पेंक्रियाटिक कॅन्सरमुळे त्यांची प्राणज्योत मालवली. या आजाराने त्यांना खूप त्रास सहन करावा लागला होता. आज त्या आपल्यात नाहीत, मात्र आपल्या उत्कृष्ट कलाकृतींच्या माध्यमातून त्या कायम आपल्यात राहतील. नर्सिगच नव्हे तर बॉलिवूडमधील अनेक प्रसिद्ध कलाकारांचे कोणत्या ना कोणत्या आजाराने निधन झाले आहे...
अविस्मरणीय भूमिका...
नर्गिस यांनी आपल्या फिल्मी करिअरमध्ये अनेक अविस्मरणीय भूमिका वठवल्या. विशेष म्हणजे मदर इंडिया या सिनेमातील त्यांची भूमिका प्रेक्षक कधीही विसरु शकत नाहीत.
खास सिनेमे...
'अंदाज', 'श्री 420', 'बरसात', 'रात और दिन', 'काला बाजार', 'चोरी चोरी', 'आवारा', 'आग', 'खेल', 'जान पहचान', 'दीदार', 'आशियाना', 'धुन', 'पापी' हे त्यांचे गाजलेले निवडक सिनेमे आहेत.
पेंक्रियाटिक कॅन्सर
पेंक्रियाटिक कॅन्सरमुळे नर्गिस यांचे निधन झाले. 3 मे 1981 रोजी त्यांनी या जगाचा निरोप घेतला. संजय दत्तचा पहिला सिनेमा 'रॉकी'चा प्रीमिअर 7 मे 1981 मध्ये झाला होता. त्याच्या चार दिवसांआधीच म्हणजे 3 मे रोजी नर्गिस यांचा मृत्यू झाला. प्रीमिअरवेळी त्यांच्या स्मरणार्थ त्यांच्या नावाची एक खुर्ची रिकामी ठेवण्यात आली होती.
एक मुलगा, दोन मुली
नर्सिग यांनी प्रसिद्ध अभिनेते सुनील दत्त यांच्यासोबत लग्न केले होते. त्यांना एक मुलगा आणि दोन मुली आहेत. संजय दत्त हे मुलाचे तर नम्रता आणि प्रिया दत्त ही मुलींची नावे आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या अशाच काही स्टार्सविषयी ज्यांचा आजारपणामुळे अकाली मृत्यू झाला...