आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Tragedy : या \'रसना गर्ल\'चा जन्म आणि मृत्यू झाला एकाच दिवशी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'आय लव्ह यू रसना' असे म्हणत घराघरात पोचलेली 'रसना गर्ल' तरुणी सचदेव हिने या जगाचा निरोप घेऊन तीन वर्षांचा काळ लोटला आहे. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी या उद्योन्मुख बालकलाकाराचे निधन झाले. 14 मे 2012 रोजी नेपाळमधील जेमसोम विमानतळावर झालेल्या विमान दुर्घटनेत तरुणीसह तिची आई गीता सचदेव यांचाही मृत्यू झाला होता.
14 मे 1998 मध्ये जन्म आणि 14 मे 2012 रोजी निधन
तरुणीचा जन्म 14 मे 1998 मध्ये मुंबईत झाला होता. वयाच्या अवघ्या सहाव्या वर्षी तिने अभिनय क्षेत्रात पाऊल ठेवले होते. अल्पावधीतच तरुणी 50 हून अधिक जाहिरातींमध्ये झळकली होती. तरुणीने रसना, कोलगेट, आयसीआयसीआय बँक, सफोला केसर बदाम मिल्क यांसारख्या अनेक जाहिरातींमध्ये काम केले होते. इतकेच नाही तर 'पा' या सिनेमात तिला अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली होती. दक्षिणेतील अनेक सिनेमांमध्येही ती झळकली होती. मल्ल्याळम चित्रपट 'वेलिंक्षत्रम्' आणि 'सत्यम्' हे तिचे दक्षिणेतील गाजलेले सिनेमे आहेत.
तरुणीविषयी सांगायची एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिची जन्म आणि मृत्यूची तारीख एकच आहे. 14 मे 1998 मध्ये तिचा जन्म झाला होता आणि याचदिवशी म्हणजे 14 मे 2012 रोजी तिने या जगाचा कायमचा निरोप घेतला.
पुढील स्लाईड्समध्ये पाहूुयात, तरुणीची कायम आठवणीतील राहतील अशी छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...