आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LIFE IN PHOTOS: पत्नीच्या निधनानंतर एकटे पडले होते शशी कपूर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाईल फोटो- शशी कपूर, पत्नी जेनिफर आणि मुले.)
मुंबई- पृथ्वीराज कपूर यांना तीन मुलगे होते. त्यांची नावे राज कपूर, शम्मी कपूर आणि शशी कपूर. 1956 मध्ये शशी कपूर यांची भेट इंग्रजी अभिनेत्री जेनिफर कॅंडेल हिच्यासोबत झाली. तेव्हा ते कोलकत्यात वेगवेगळ्या थिएटर ग्रुपसोबत काम करीत होते. यावेळी त्यांची जेनिफर यांच्यासोबत मैत्री झाली. मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. सुरवातीला जेनिफर लग्नासाठी तयार नव्हत्या. पण शम्मी कपूर यांची पत्नी गीता बाली यांनी समजवल्यावर त्या लग्नाला तयार झाल्या. शशी यांना तीन मुले आहेत. करण कपूर आणि कुणाल कपूर असे दोन मुले तर संजना कपूर ही मुलगी आहे.
पत्नीसोबत स्थापन केले पृथ्वी थिएटर
1978 मध्ये जेनिफर यांच्या मदतीने शशी यांनी पृथ्वी थिएटरची स्थापना केली. त्यानंतर सहा वर्षांनी जेनिफर यांचे निधन झाले. यावेळी शशी अगदी एकटे पडले. वयाच्या चौथ्या वर्षी शशी कपूर यांनी वडील पृथ्वीराज यांच्यासोबत एका नाटकात काम केले होते.
सुरवातीला शशीराज नावाने काम
संग्राम आणि दाना पानी या चित्रपटांमध्ये शशी कपूर यांनी शशीराज या नावाने काम केले. यश चोपडा यांच्या धर्मपूत्र या चित्रपटात लिड अॅक्टर म्हणून डेब्यू केला. तब्बल 61 चित्रपटांमध्ये त्यांनी सोलो अॅक्टर म्हणून काम केले. 55 चित्रपटांमध्ये मल्टी स्टारर अॅक्टर म्हणून काम केले आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, शशी कपूर यांचे बालपणीचे निरागस फोटो.... त्यांचा जिवनप्रवास...