आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखेरच्या काळात अशी दिसायची 80 च्या दशकातील ही Sex सिम्बॉल, मृत्यू आजही आहे रहस्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये अनेक असे स्टार आहेत, ज्यांनी करिअरच्या सुरुवातीला स्टारडम, प्रसिध्दी, पैसा मिळवला. परंतु अखेरच्या काळात ते अज्ञातवासात गेले. यामध्ये अभिनेत्री परवीन बाबीचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. परवीन बाबीने अनेक सुपरहिट सिनेमांत काम केले. परंतु आयुष्यातील शेवटचे दिवस तिने एकांतातच घालवले. तिचे मानसिक संतुलन बिघडले होते. 
 
 
तीन दिवसांनंतर कळली होती मृत्यूची बातमी...
परवीन बाबीची गणना बॉलिवूडच्या सुपरस्टार्समध्ये होते. पण सुपरस्टार असूनदेखील शेवटच्या काळात ती एकटी होती. महेश भट, कबीर बेदी, डॅनी यांच्यासोबतचे तिचे प्रेमकिस्से बरेच गाजले होते. मात्र प्रेमात नेहमीच तिच्या पदरी अपयश पडले. 'दीवार', 'नमक हलाल', 'अमर अकबर अँथोनी' आणि 'शान'सारख्या सुपरहिट सिनेमांत काम करणा-या परवीन बाबीचा मृत्यू मुंबईमधील तिच्या अपार्टमेंटमध्ये झाला होता. 22 जानेवारी 2005ला तिचा मृतदेह अपार्टमेंटमध्ये मिळाला होता. तिच्या शेजा-यांनी पोलिसांना सूचना दिली, की ती मागील तीन दिवसांपासून वर्तमानपत्र आणि दूध घेत नाहीये. त्यानंतर पोलिसांनी याची चौकशी केली. परवीन मुंबईमध्ये दिर्घकाळ एकटी राहिली. ती डिप्रेशनची शिकार झाली होती आणि तिने स्वत: जगापासून दूर ठेवले होते. ती कुणालाच भेटत नव्हती, सिनेमांतून अचानक गायब होऊन अज्ञातवासात गेली होती.
 
कॉलेज गर्ल ते अभिनेत्री परवीन बाबी
गुजरातच्या जुनागढमधील एका मुस्लिम कुटुंबामध्ये परवीनचा जन्म झाला. तिचे प्राथमिक शिक्षण माउंट कार्मल हायस्कुल अहमदाबाद येथे पूर्ण झाले. त्यानंतर तिने अहमदाबादच्या सेंट झेव्हियर्स कॉलेजमधून पदवी शिक्षण पूर्ण केले. त्यावेळी सिनेमा निर्माता बीआर इशारा यांची नजर परवीनवर पडली. मिनी स्कर्ट परिधान करून सिगारेट ओढण्याच्या परवीनच्या या अंदाजाने त्यांना एकप्रकारे भूरळच घातली. त्यांनी लगेच तिला 'चरित्र'(1973) या सिनेमासाठी साइन केले. तिचा हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही परंतु परवीनसाठी अभिनयाच्या क्षेत्राने दार उघडे केले होते. त्यानंतर परवीनचे अनेक सिनेमे प्रदर्शित झाले. त्यातील काही अपयशी तर काही हिट होत गेले.

1974मध्ये अमिताभ बच्चनसोबत आलेला तिचा 'मजबूर' या सिनेमाने तिला इंडस्ट्रीची ग्लॅमर गर्ल म्हणून ओळख निर्माण करून दिली. परवीन बाबी मोठ्या पडद्यावर नेहमीच बोल्ड अंदाजात दिसली. मग तो बोल्ड अंदाज तिच्या वेशभूषेचा असो अथवा तिच्या जगण्याचा पण ती बोल्ड राहण्याचा पूरेपुर प्रयत्न करत होती.

पुढील स्लाईड्सवर वाचा, तीन अफेयरनंतरही अविवाहित राहिली परवीन, सोबतच वाचा तिच्याविषयीच्या आणखी काही खास गोष्टी..  
बातम्या आणखी आहेत...