आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dara Singh\'s Fight Against King Kong Will Always Be Remembered

...जेव्हा दारा सिंह यांनी किंग काँगला चारली धूळ, पाहा पर्सनल लाइफ Photos

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किंग कॉन्ग आणि दारा सिंह यांच्यातील एक कुस्तीची लढत
19 नोव्हेंबरला पहिलवानपासून अभिनेते बनलेले पुस्तमे-हिंद दारा सिंह यांचा वाढदिवस आहे. त्यांनी केवळ जून्या परंपरांना अधुनिकतेशी जोडले नाही तर ते देशातील लोकांसाठी उत्कृष्ट उदाहरणसुध्दा होते. किंग काँगसोबत झालेल्या त्यांची ती अविस्मरणीय लढत असो अथवा रामायणमध्ये साकारलेली वीरबली हनुमानची भूमिका. दारा सिंह प्रत्येक भूमिकेत तंतोतंत बसत होते. अनेक हिंदी सिनेमांत अविस्मरणीय भूमिका साकारणारे दारा सिंह यांचे 12 जुलै 2012मध्ये दिर्घ आजाराने निधन झाले.
King Kongने केले होते Challenge-
रामायण मालिकेतील हनुमान आणि भारतातील पहिले पहिलवान दारा सिंह यांनी रांची अब्दुल बारी पार्कमध्ये नोव्हेंबर 1962मध्ये जगातील प्रसिध्द पहिलवान किंग काँगचा पराभव केला होता. सिडनीच्या किंग काँगने दारा सिंह यांना कुस्ती खेळण्यासाठी आव्हान दिले होते. नोव्हेंबर 1962मध्ये जगातील सर्व पहिलवान रांचीमध्ये जमले होते. या लढतीत 200 किलोचा किंग काँग समोर दारा सिंह लहान मुलासारखे दिसत होते. परंतु दारा सिंह यांचा आत्मविश्वास त्याच्यावर भारी पडला. या लढतीत दारा सिंह यांनी किंग काँगला तीनवेळा चीतपट केले. एकदा तर त्यांनी सहा फुट लांब किंग काँगला उचलून टि्वस्ट करून एरिनामधून खाली फेकले होते. कुस्तीदरम्यान जेव्हा-जेव्हा दारा सिंह यांनी किंग काँगला धूळ चारली तेव्हा सर्व प्रेक्षकांच्या तिरस्काराने हॉल गुंजला. आजसुध्दा लोकांचा ती लढत स्मरणात आहे.
रुस्तम-ए-हिंद यांच्या वाढदिवसानिमित्त divyamarathi.com तुम्हाला दाखवत आहे, दारा सिंह यांच्या खासगी आयुष्यातील निवडक फोटो...
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दारा सिंह यांचे पर्सनल लाइफ फोटो...
फोटो: साभार darasingh.com