आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

D\'Anniv: प्रेमात वारंवार मिळालेल्या विश्वासघाताने दारूच्या आधीन गेल्या होत्या मीना कुमारी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(मीना कुमारी)
मुंबई- भारतीय सिनेमाच्या उत्कृष्ट कलाकार मीना कुमारीचे 31 मार्च 1972 रोजी निधन झाले होते. ऑगस्ट 1932मध्ये जन्मलेल्या मीना कुमारी यांचे मूळ नाव महजबी बानो होते. त्यांनी खूप कमी वयात सिनेमांत काम करण्यास सुरुवात केली होती. मीना हिंदी सिनेसृष्टीच्या ट्रॅजेडी क्वीन म्हणून ओळखल्या जातात. रुपेरी पडद्यावर दु:खद आणि ट्रॅजिक भूमिका केल्या आणि दमदार अभिनय करून आपली ओळख युगायुगांपर्यंत कायम ठेवली. मीना कुमारी नृत्यकलेत पारंगत होत्या. 30 वर्षांच्या करिअरमध्ये त्यांनी जवळपास 90 पेक्षा जास्त सिनेमांत काम केले. यामधील सर्वाधिक सिनेमे क्लासिक मानले गेले.
ख-या प्रेमाच्या भटकत होत्या मीना कुमारी-
पडद्यावर मीन कुमारी यांनी आपल्या पात्राला सजीव केले, तसेच त्यांचे खासगी आयुष्यसुध्दा ट्रॅजिक होते. 'साहिब, बीवी और गुलाम' (1962) या क्लासिक सिनेमामध्ये मीना कुमारी यांनी धाकट्या सूनेची भूमिका साकारली होती. केवळ या पात्रामुळेच त्या दारूच्या आधीन गेल्या.
करिअरच्या यशोशिखरावर पोहोचल्यानंतर आपले दु:ख लपवण्यासाठी मीना कुमारी दारू प्यायला लागल्या. प्रेमात वारंवार धोका खाल्ल्याने त्यांचे मन खचून गेले होते. त्या सतत ख-या प्रेमाच्या शोधात असायच्या. परंतु या झगमग जगात त्यांनी केवळ धोका आणि विश्वासघातच मिळतच गेला. त्यांना अनेकदा अपमानही सहन करावा लागला. याला कंटाळून त्यांनी आपले आयुष्य मद्यपानात बुडवून टाकले. मर्यादेपेक्षा जास्त मद्यपान केल्याने त्यांची प्रकृती खालावत चालली होती आणि त्या लिव्हर सिरोसिस आजाराने त्रस्त झाल्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा ट्रॅजेडी क्वीन मीना कुमारी यांच्या आयुष्यातील काही रंजक फॅक्ट्स...