आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

D\'Anniv: 2 कोटींच्या तोट्याने खचली होती ही बोल्ड अॅक्ट्रेस, गळफास घेऊन केली होती आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अभिनेत्री सिल्क स्मिता)
मुंबई: 2011मध्ये विद्या बालनच्या 'द डर्टी पिक्चर'ने बॉलिवूडमध्ये जोरदार प्रदर्शन केले होते. या प्रत्येकाला थिएटरपर्यंत यायला मजबूर केले होते. बॉक्स ऑफिसवर इतर सिनेमांना मागे टाकत या सिनेमाने धमाकेदार ओपनिंग केले होते. सोबतच, विद्या बालनच्या डूबत्या करिअरला आधार मिळाला होता, परंतु या यशाच्या मागे एका नाव दडलेले आहे. ते म्हणजे सिल्क स्मिता. सिल्क दाक्षिणात्य अभिनेत्री असून तिने साउथ इंडस्ट्रीमध्ये नाव कमावले होते. 'द डर्टी पिक्चर' हा सिनेमा सिल्क स्मिताच्या जीवनपटावर बनलेली आहे. साउथ इंडस्ट्रीमधील प्रसिध्द या अभिनेत्रीची आज पुण्यतिथी आहे.
80च्या दशकात साउथ सिनेमांमध्ये सिल्क स्मिताची जादू अशी चालली, जी लोक आजही विसरू शकलेले नाहीत. सिल्कचा जन्म 2 डिसेंबर 1960 रोजी आंध्रप्रदेशमध्ये राजमुंदरीच्या एल्लरुमध्ये झाला. तिचे बालपणीचे नाव विजयलक्ष्मी होते. सिल्क गरीब कुटुंबातली असल्याने ती स्वत:चे शिक्षण पूर्ण करू शकली नव्हती. त्यामुळे सिल्कने केवळ चौथीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर तिने सिनेमांमध्ये मेकअप असिस्टंट म्हणून कामास सुरुवात केली. स्मिता शूटिंगदरम्यान अभिनेत्रींच्या चेह-यावर टचअपचे काम करत होती. सिनेमामधील झगमगाट पाहून स्मिताही अभिनेत्री होण्याचे स्वप्न बघू लागली होती.
एका ब्रेकने उजळले होते नशीब
स्मिताला 1978मध्ये 'बेदी' या कन्नडी सिनेमामध्ये पहिल्यांदा झळकली. तिला सर्वात मोठा ब्रेक 'वांडीचक्रम' (1979) सिनेमातून मिळाला होता. या सिनेमात तिने स्मिताचे पात्र साकारले होते. लोकांनी तिची ही भूमिका डोक्यावर घेतली. सोबतच, तिने मद्रासी चोलीची फॅशनसुध्दा ट्रेंडमध्ये आणली. या पात्राच्या प्रसिध्दीने तिला सिल्क स्मिता नाव दिले. 1983मध्ये तिने 'सिल्क सिल्क सिल्क' नावाचा एक सिनेमा केला होता. करिअरमधील तीन वर्षांमध्ये तिने जवळपास 200 सिनेमांमध्ये काम केले.
पैसा कमावण्यासाठी तीन शिफ्टमध्ये करत होती काम
सिल्कची जादू हळू-हळू इंडस्ट्रीमध्ये चालायला लागली होती. तिच्या चाहत्यांची संख्या इतकी वाढली होती, की प्रत्येक दिग्दर्शकाला स्मिता आपल्या सिनेमात असावी असे वाटू लागले. त्यामुळे स्मिता एका दिवशी 3-3 शिफ्टमध्ये काम करत होती. ती एका गाण्यासाठी 50 हजार रुपये मानधन घेत होती. साउथचे सुपरस्टार शिवाजी गणेशन, रजनिकांत, कमल हसन, चिरंजीवी या अभिनेत्यांपर्यंत सर्वांनाच स्मिताचे एक गाणे आपल्या सिनेमात असावे अशी इच्छा असायची. एकापाठोपाठ एक सिनेमा करून तिने 10 वर्षांमध्ये जवळपास 500 सिनेमांमध्ये काम केले.
बॉलिवूडमध्ये केली होती एंट्री
सिल्कच्या यशाची जादू बॉलिवूडमध्येसुध्दा चालली होती. जितेंद्र-श्रीदेवी आणि जितेंद्र-जयाप्रदा यांची जोडी लोकप्रिय झालेली असताना स्मिताने बॉलिवूडमध्ये एंट्री केली. तिने 'जीत हमारी' सिनेमामधून बी-टाऊनमध्ये पदार्पण केले. त्यानंतर 'ताकतवाला', 'पाताल भैरवी', 'तूफान रानी', 'कनवरलाल', 'इज्जत आबरू', 'द्रोही' आणि 'विजय पथ'सारख्या सिनेमांमध्ये तिने उत्कृष्ट काम केले.
निर्माती बनून झाला होता कोट्यवधींचा तोटा
सिनेमांमध्ये अभिनय आणि गाण्यातून कोटींची कमाई करून स्मिताने निर्माती होण्याचे स्वप्न उराशी बाळगले. तिच्या एका मित्राने तिला निर्माती झाल्यास खूप पैसा कमावशील असा सल्ला दिला. मात्र तिला पहिल्याच 2 सिनेमांमध्ये कोटींचे नुकसान झाले. तिचा तिसरा सिनेमा निर्माती म्हणून पूर्णच होऊ शकला नाही. सिनेमांमध्ये झालेल्या तोट्याने स्मिताच्या खासगी आयुष्यावर खूप मोठा परिणाम झाला. ती मानसिकरित्या खचून गेली होती.
फाशी घेऊन केली होती आत्महत्या
23 सप्टेंबर 1996 रोजी सिल्क स्मिताचा मृतदेह राहत्या घरी पंख्याला लटकलेला दिसला. तिच्या आत्महत्येच्या बातमीने साउथ फिल्म इंडस्ट्रीमध्ये खळबळ उडाली होती. पोलिसांनी आत्महत्या म्हणून प्रकरण बंद केले. मात्र काही लोकांच्या म्हणणे आहे, की तिच्या मृत्यूच्या मागे दुसरे कारण आहे. अशाप्रकारे 18 वर्षांपर्यंत साउथ फिल्म इंडस्ट्रीवर राज्य करणारी ही अभिनेत्रीने लोकांना वेड लावून या जगाचा निरोप घेतला.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा दाक्षिणात्य फिल्म इंडस्ट्रीसह बॉलिवूडमध्ये जादू चालवणारी स्लिक स्मिताची काही निवडक छायाचित्रे...