आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंजूस स्वभावामुळे प्रसिद्ध होता हा अभिनेता, बंगला विकल्यावर रडला होता ढसाढसा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडमध्ये 'ज्युबिली हिरो'च्या नावाने प्रसिद्ध असलेले राजेंद्र कुमार यांची  12 जुलै रोजी डेथ अॅनिवर्सरी आहे. अनेक सुपरहिट चित्रपटात काम करणारे राजेंद्र कुमार कंजूसपणासाठी प्रसिद्ध होते. ते कधीच मित्रांवर अथवा स्वतःवरही पैसे खर्च करत नसत. यामुळे त्यांना सर्वजण कंजूस म्हणत असत. जेव्हा त्यांची आर्थिक परिस्थिती खराब झाली तेव्हा त्यांना त्यांचा प्रिय डिंपल बंगला विकावा लागला होता. त्यांनी हा बंगला राजेश खन्ना यांना विकला. ज्यादिवशी बंगला सोडून जायचे होते त्याच्या आदल्या रात्री ते ढसाढसा रडले होते. केवळ 50 रुपये घेऊन ते मुंबईत हिरो बनण्यासाठी आले होते. 
 
राजेंद्र कुमार यांना चित्रपटात काम मिळवण्यासाठी फार संघर्ष करावा लागला. ते मुंबईत आले तेव्हा त्यांच्याकडे फक्त 50 रुपये होते जे त्यांना वडिलांची घड्याळ विकून मिळाले होते. गीतकार राजेंद्र कृष्ण यांच्या मदतीने त्यांना 150 रुपयाच्या पगारावर दिग्दर्शक एचएस रावल यांच्याकडे सहाय्यक निर्देशक म्हणून काम मिळाले. 1950 रोजी आलेला चित्रपट 'जोगन' मध्ये राजेंद्र कुमार यांना काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी त्यांच्यासोबत लीड रोलमध्ये दिलीप कुमार होते. 1950 ते 1957 पर्यंत त्यांना चित्रपटसृष्टीत संघर्ष करावा लागला. 1957 आली आलेल्या मदर इंडिया चित्रपटातील त्यांच्या कामाचे कौतुक झाले.
 
'गूंज उठी शहनाई' पहला हिट चित्रपट
1959 साली आलेला चित्रपट 'गूंज उठी शहनाई' राजेंद्र कुमार यांचा पहिला हिट चित्रपट होता. त्यांनी 'धूल का फूल' (1959), 'मेरे महबूब' (1963), 'आई मिलन की बेला' (1964), 'संगम' (1964), 'आरजू' (1965), 'सूरज' (1966) यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. त्यांची सफलता पाहून त्यांच्या फॅन्सनी त्यांचे नाव 'जुबली कुमार' ठेवले.
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, राजेंद्र कुमारशी निगडीत काही गोष्टी..
बातम्या आणखी आहेत...