आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वडील का होऊ शकले नाहीत दिलीप कुमार? यामागे आहे एक वेदनादायक कारण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः बॉलिवूडमध्ये ट्रॅजेडी किंग म्हणून प्रसिद्ध असलेले अभिनेते दिलीप कुमार यांना एकही अपत्य नसल्याचे सर्वांनाच ठाऊक आहे. मात्र ते वडील का होऊ शकले नाहीत, याचे कारण फारच कमी जणांना ठाऊक आहे. याचे उत्तर त्यांनी 'द सबस्टांस अँड द शॅडो' या त्यांच्या ऑटोबायोग्राफीत दिले आहे. या पुस्तकात दिलीप कुमार यांनी सांगितले, "सत्य हे आहे, की 1972 साली सायरा पहिल्यांदा गर्भवती झाल्या होत्या. आमचा तो मुलगा होता. (नंतर आम्हाला हे कळले.) आठव्या महिन्यात सायरा यांना ब्लडप्रेशरचा त्रास झाला. त्यामुळे त्यावेळी त्यांचे ऑपरेशन करणे शक्य नव्हते आणि श्वास गुदमरुन बाळाचा मृत्यू झाल." या घटनेनंतर सायरा कधीच प्रेग्नेंट होऊ शकल्या नाहीत, असेही दिलीप कुमार यांनी सांगितले.
दुस-या लग्नाचे सत्य
1980 साली दिलीप कुमार यांनी आसमा रहमान नावाच्या महिलेसोबत दुसरे लग्न केले होते. सायरा आई होऊ शकत नसल्यामुळे बाळासाठी दिलीप साहेबांनी दुसरे लग्न केल्याची चर्चा याकाळात मीडियात सुरु झाली होती. मात्र ऑटोबायोग्राफीत दिलीप कुमार यांनी याचे खंडन केले असून सायरा आई का होऊ शकल्या नाहीत, याचे खरे कारण (जे आम्ही वर सांगितले आहे.) सांगितले. आसमासोबत दिलीप कुमार यांनी दुसरे लग्न केल्यानंतर त्यांच्या आणि सायरा यांच्या नात्यात दुरावा निर्माण झाला होता. मात्र लग्नाच्या दोन वर्षांनी म्हणजे 1982 साली दिलीप कुमार यांनी आसमाला घटस्फोट दिला होता.
1966 मध्ये केले होते सायरासोबत लग्न
दिलीप कुमार आणि सायरा बानो यांचे 11 ऑक्टोबर 1966 रोजी लग्न झाले होते. सायरा दिलीप साहेबांपेक्षा वयाने तब्बल 22 वर्षे लहान आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, वयाच्या आठव्या वर्षीपासून सायरा दिलीप साहेबांसोबत लग्नाचे स्वप्न रंगवत होत्या. 1952 साली रिलीज झालेला 'दाग' सिनेमा बघून सायरा दिलीप साहेबांच्या प्रेमात पडल्या होत्या.
दिलीप आणि सायरा गेल्या 49 वर्षांपासून सुखी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. एक नजर टाकुया त्यांनी घालवलेल्या सुंदर क्षणांवर... पुढील स्लाईड्समध्ये तुम्ही दोघांची खास छायाचित्रे बघू शकता...
नोटः रविवारी दिलीप कुमार यांना पद्मविभूषण या भारताच्या दुस-या सर्वात मोठ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यानिमित्ताने divyamarathi.com तुम्हाला त्यांच्या आयुष्याशी निगडीत खास गोष्टी सांगत आहे...
बातम्या आणखी आहेत...