आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 16 व्या वर्षी डिंपलने काकांसोबत थाटले होते लग्न, अशी सुरु झाली होती Love Story

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजेश खन्ना आणि डिंपल यांच्या लग्नातील खास क्षण. - Divya Marathi
राजेश खन्ना आणि डिंपल यांच्या लग्नातील खास क्षण.
एन्टरटेन्मेंट डेस्कः एकेकाळी आपल्या बोल्ड इमेजसाठी प्रसिद्ध राहिलेल्या बॉलिवूड अभिनेत्री डिंपल कपाडिया यांनी आज (8 जून) आपल्या वयाची 59 वर्षे पूर्ण केली आहेत. पडद्यावर पारंपरिक इमेजला तडा देत नवीन ट्रेंड सेट करणा-या डिंपल यांचा जन्म 8 जून 1957 रोजी एका गुजराती कुटुंबात झाला. सौंदर्य, आकर्षक हेअरस्टाइल आणि उत्कृष्ट अभिनयाच्या बळावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणा-या डिंपल यांनी 'बॉबी' सिनेमाद्वारे करिअरला सुरुवात केली. 1973 मध्ये रिलीज झालेल्या या सिनेमाने त्या एका रात्रीत स्टार झाल्या. डिंपल यांनी आपल्या करिअरमध्ये 'सागर', 'जांबाज', 'कब्जा', 'रामलखन', 'खून का कर्ज', 'अजूबा', 'रुदाली', 'क्रांतिवीर', 'मृत्युदाता', 'दबंग' आणि 'कॉकटेल'सह अनेक सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडली.
अशी सुरु झाली होती डिंपल-राजेश खन्नांची लव्ह स्टोरी...
हिंदी फिल्म इंडस्ट्रीची ग्लॅमरस अभिनेत्री आणि गुजराती गर्ल डिंपल कपाडिया यांची राजेश यांच्याशी पहिली भेट अहमदाबादच्या नवरंगपूरा स्पोर्ट्स क्लबमध्ये झाल्याचे फार कमी जणांना ठाऊक आहे. बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना 70च्या दशकात नवरंगपूरा स्पोर्ट्स क्लबच्या कार्यक्रमात प्रमुख पाहूणे म्हणून आले होते. इथेच त्यांची भेट डिंपल यांच्याशी झाली. ते पहिल्याच नजरेत डिंपल यांच्या प्रेमात पडले. येथूनच राजेश आणि डिंपल यांच्या लव्ह-स्टोरीला सुरूवात झाली. तीन वर्षे डेट केल्यानंतर त्यांनी लग्नाचा निर्णय घेतला. या काळात राजेश सतत गुजरातचा प्रवास करायचे. त्यांना गुजराती नाटकांची आवड होती. गुजराती नाटकार आणि अभिनेते प्रवीण जोशी यांच्या नाटकांचे चाहते होते.

वयाने 15 वर्षे मोठे असलेल्या राजेश खन्नासोबत झाले होते डिंपल यांचे लग्न...
राजेश आणि डिंपल यांचे लग्न 1973 मध्ये झाले होते. या लग्नाची खास गोष्ट म्हणजे त्यावेळी डिंपल केवळ 16 वर्षांच्या होत्या. त्या काकांच्या वयापेक्षा खूप लहान होत्या. या दोघांना दोन मुली टिंवकल आणि रिंकी आहेत. राजेश आणि डिंपल यांनी लग्न केले मात्र त्यांचे वैंवाहिक जीवन जास्त काळ टिकू शकले नाही. राजेश खन्ना यांचे पहिले प्रेम अंजू महेंद्रू होते. तसेच त्यांचे अनिता अडवाणी यांच्यासोबतही अफेअर होते. राजेश अनितासह बरचे दिवस लिव्ह-इनमध्ये होते.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि पाहा राजेश आणि डिंपल यांचे लग्न आणि फॅमिली फोटोज...


(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...