आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Life Facts: दारा सिंह यांनी एका झटक्यात 200 किलोच्या किंग काँगला लोळवले होते

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किंग कॉन्ग आणि दारा सिंह यांच्यातील एक कुस्तीची लढत - Divya Marathi
किंग कॉन्ग आणि दारा सिंह यांच्यातील एक कुस्तीची लढत
सलमान खानने अलीकडेच एका मुलाखतीत 'सुल्तान' सिनेमाच्या शूटिंगवेळी त्याला सहा तास रिंगमध्ये खूप कष्ट घ्यावे लागत होते. 120 किलोंच्या पहिलवानांना उचलून चितपट करावे लागत होते. जेव्हा तो रिंगच्या बाहेर येत होता, तेव्हा तो खूप थकलेला असायचा. सलमानने हे सर्व 'सुल्तान' सिनेमाच्या शूटिंगदरम्यान केले. परंतु एक असाच पहिलवान होता, ज्याने अनेकांना रिंगमध्ये धूळ चारली होती. या पहिलावानचे नाव आहे दारा सिंह. दारा सिंह यांनी अनेक दिग्गज आणि प्रसिध्द पहिलवानांना रिंगमध्ये मात दिली होती. त्यांनी आयुष्यात केलेल्या सर्वाधिक फाइट जिंकल्या होत्या.
King Kongने केले होते Challenge-
रामायण मालिकेतील हनुमान आणि भारतातील पहिले पहिलवान दारा सिंह यांनी रांची अब्दुल बारी पार्कमध्ये नोव्हेंबर 1962मध्ये जगातील प्रसिध्द पहिलवान किंग काँगचा पराभव केला होता. सिडनीच्या किंग काँगने दारा सिंह यांना कुस्ती खेळण्यासाठी आव्हान दिले होते. नोव्हेंबर 1962मध्ये जगातील सर्व पहिलवान रांचीमध्ये जमले होते. या लढतीत 200 किलोचा किंग काँग समोर दारा सिंह लहान मुलासारखे दिसत होते. परंतु दारा सिंह यांचा आत्मविश्वास त्याच्यावर भारी पडला. या लढतीत दारा सिंह यांनी किंग काँगला तीनवेळा चीतपट केले. एकदा तर त्यांनी सहा फुट लांब किंग काँगला उचलून टि्वस्ट करून एरिनामधून खाली फेकले होते. कुस्तीदरम्यान जेव्हा-जेव्हा दारा सिंह यांनी किंग काँगला धूळ चारली तेव्हा सर्व प्रेक्षकांच्या तिरस्काराने हॉल गुंजला. आजसुध्दा लोकांचा ती लढत स्मरणात आहे.
divyamarathi.com तुम्हाला सांगत आहे, दारा सिंह यांच्या खासगी आयुष्याशी निगडीत काही रंजक फॅक्ट्स...पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा...
बातम्या आणखी आहेत...