आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Read:Facts About Jiah Khan You Would Have Never Known And See Unseen Pics

B\'Ann: वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी निःशब्द झालेली आठवणीतील जिया

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आठवणीतील जिया खान)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री जिया खान हिची आज 27वी बर्थ अॅनिव्हर्सरी आहे. जियाचा जन्म 20 फेब्रुवारी 1988 रोजी न्यूयॉर्कमध्ये झाला होता. जिया उर्फ नफिसा खानचे वडील अली रिजवी भारतीय वंशाचे तर आई अमेरिकन नागरिक आहे. जियाची आई राबिया अमीन स्वतः एक अभिनेत्री आहेत.
जियाने आपल्या छोट्याशा फिल्मी करिअरमध्ये बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी छाप सोडली होती. वयाच्या अवघ्या 25 व्या वर्षी म्हणजे 3 जून 2013 रोजी जियाने या जगाचा निरोप घेतला. मुंबईतील आपल्या राहत्या घरी जिया छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली होती. जियाच्या अकाली निधनाने संपूर्ण बॉलिवूड स्तब्ध झाले होते. जियाने आत्महत्या का केली हा आजही अनुत्तरित प्रश्न आहे. बातम्यांनुसार, जियाच्या मृत्यूसाठी तिचा बॉयफ्रेंड सूरज पांचोली जबाबदार असल्याचे म्हटले जाते. सूरज पांचोलीवर कोर्टात खटला सुरु आहे जियाची आई राबिया खान यांनी सूरज पांचोलीवर जियाच्या हत्येचा आरोप लावला आहे.
जियाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एक नजर टाकुया तिच्या आठवणीतील छायाचित्रांवर...