मुंबई: 2001मध्ये आलेल्या ब्लॉकबस्टर 'लगान' सिनेमाला रिलीज होऊन 15 वर्षे उलटून गेली आहेत. 2001मध्ये आजच्याच दिवशी रिलीज झालेल्या या सिनेमाचा ऑस्करसाठी नामांकन मिळाले होते. सिनेमाशी निगडीत अनेक गोष्टी आहेत, ज्या आजही लोकांना ठाऊक नाहीत. जसे, सिनेमात 'गुरन' नावाचे पात्र साकारणारा अभिनेता राजेश विवेक आता या जगात नाहीये. तसेच कॅप्टन एंड्र्यू रसेलचे पात्र वठवणारा ब्रिटीश अभिनेता आता 'गेंडा बचाओ कॅम्पेन'शी जुळला आहे.
सिनेमाचे अनेक कलाकार आता कुठे आहेत, काय करत आहेत. तसेच गेल्या 15 वर्षांत त्यांच्याच्या किती बदल झाला आहे. या गोष्टी जाणून घेण्याची सर्वांची उत्सूकता आहे. आज आम्ही तुम्हाला इतक्या वर्षांत 'लगान'च्या स्टारकास्टमध्ये किती बदल झाला, ते दाखवत आहोत.
ग्रेसी सिंह...
'लगान'नंतर 'मुन्नाभाई एमबीबीएस' आणि 'गंगाजल' सिनेमांत काम केलेली लगानची गौरी अर्थातच ग्रेसी सिंह सध्या 'संतोषी मां' मालिकेत दिसत आहे. ग्रेसी अलीकडेच उज्जैनमध्ये झालेल्या सिंहस्थमध्येसुध्दा पोहोचली होती. ग्रेसीने 'अमानत' या टीव्ही मालिकेतसुद्धा काम केले आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'लगान'च्या इतर स्टारकास्टचे पूर्वी आणि आताचे फोटो...