आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B'day: माधुरी दीक्षितच्या वेडिंग रिसेप्शनला जमली होती सेलिब्रिटींची मांदियाळी, पाहा PIX

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(डावीकडे - पती श्रीराम नेनेंसोबत माधुरी, उजवीकडे वर - सायरा बानो आणि दिलीप कुमार यांच्यासोबत माधुरी-श्रीराम नेने, खाली - दिवंगत अमरिश पुरी यांच्यासोबत माधुरी-श्रीराम नेने)

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री माधुरी दीक्षित आज आपला 48 वा वाढदिवस साजरा करत आहे. व्यवसायाने डॉक्टर असलेल्या श्रीराम नेनेंची माधुरीने आपल्या जोडीदाराच्या रुपात निवड केली. 17 ऑक्टोबर 1999 मध्ये माधुरी दीक्षित आणि डॉ. श्रीराम नेने लग्नगाठीत अडकले होते. डॉ. नेने हे हृदयविकार तज्ज्ञ आहेत.
लग्नानंतर माधुरीने खास बॉलिवूडकरांसाठी रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती. यावेळी या नवदाम्पत्याला शुभेच्छा देण्यासाठी बी टाऊनमधील बरीच मंडळी पार्टीत सहभागी झाली होती. यश चोप्रा, अमिताभ बच्चन, देव आनंद, हेमामालिनी, प्रेम चोप्रा, अमरिश पुरी, नम्रता शिरोडकर, श्रीदेवी, बोनी कपूरसह अनेक सेलेब्स माधुरीला शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले होते.
विशेष म्हणजे लग्नाच्या आधीपर्यंत माधुरी मोठी स्टार आहे, हे डॉ. नेनेंना ठाऊक नव्हते. त्यांनी तिचा एकही सिनेमा पाहिला नव्हता.
आज माधुरीच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला माधुरीच्या लग्नाच्या रिसेप्शनची खास छायाचित्रे दाखवत आहोत.