आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • From Mechanic To Oscar Awardee, Have A Look At Gulzar's Life Story

गॅरेज मेकॅनिकपासून ते ऑस्कर विजेतापर्यंत, असा आहे गुलजार यांचा जीवनप्रवास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- दिग्दर्शक, गीतकार आणि कवी गुलजार)
मुंबई- एकापेक्षा एक उत्कृष्ट गाणे लिहून सिनेमांना सुंदर बनवणारे गुलजार साहेब 81 वर्षांचे झाले आहेत. दमदार आवाज असलेले गुलजार यांचा जन्म पाकिस्तानच्या झेलम जिल्ह्यात 18 ऑगस्ट 1932 झाला. त्यांच्या बालपणीचे नाव संपूर्ण सिंह कालरा आहे. उर्दू भाषेच्या जवळ असलेले गुलजार यांनी आपल्या शब्दांना गुंफण्याचा प्रयत्न केला, की आजही त्यांचे नाव सर्वत्र लोकप्रिय आहे.
गुलजार यांनी प्रत्येत मूडचे प्रत्येक शैलीचे गाणे लिहिले. मग ते मस्तीभरा 'चप्पा चप्पा चरखा चले...' असे अथवा 'दिल से रे...'सारखे गाणे, गुलजार कधीच एक लयीतील गाणे लिहिताना दिसले नाही. 'कजरारे कजरारे...', 'चाँद सिफारीश करता हमारी...', 'दिल तो बच्चा है जी'सारख्या गाण्यांपासून ते 'बिडी जलइले जिगर से पिया'सारखे गाणे लिहिण्यापर्यंत त्यांची शैली दमदार आहे. गुलजार यांनी आपल्या गाण्यामध्ये आयुष्यातील प्रत्येक रंग टाकला. आतापर्यंत 5 नॅशनल फिल्म पुरस्कार आणि 20वेळा फिल्मफेअर पुरस्कार जिंकणारे गुलजार यांना 2008मध्ये ऑस्कर अवॉर्डने सन्मानित करण्यात आले होते.
गुलजार लहान असतानाच त्यांनी आपल्या आईला गमावले. फाळणीनंतर त्यांचे संपूर्ण कुटुंबीय अमृतसरला आले. गुलजार दिल्लीमध्ये शिक्षण घेतल्यानंतर पोट भरण्यासाठी मुंबईला रवाना झाले. सुरुवातीला त्यांनी एका गॅरेजमध्ये काम केले आणि फावल्या वेळेत कविता लिहू लागले. गॅरेजमध्ये काम करत असताना गुलजार यांनी फिल्म इंडस्ट्रीमध्ये कामाचा शोध घेऊ लागले. साहित्य प्रेमी गुलजार यांची एकेदिवशी दिग्दर्शक बिमल रॉय यांच्याशी भेट झाली आणि येथूनच त्यांच्या गीतांची, संवादांची सुरुवाता झाली.
गुलजार साहेब यांनी प्रसिध्द अभिनेत्री राखीसोबत लग्न केले. त्यांना एक मुलगीदेखील आहे, तिचे नाव मेघना गुलजार आहे. राखी आणि गुलजार आज एकत्र राहत नाहीत, मात्र दोघांनी अद्याप घटस्फोट घेतलेला नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून वाचा, गुलजार यांच्या खासगी आयुष्यातील खास गोष्टी...