Home »Flashback» From Prithviraj To Ranbir Kapoor Know About Whole Kapoor Family

PHOTOS : पृथ्वीराज, राज कपूरपासून ते रणबीरपर्यंत, हे आहेत कपूर फॅमिलीतील मेंबर्स

दिव्य मराठी वेब टीम | Dec 07, 2017, 18:54 PM IST

  • [सर्वात मागे डावीकडून रीमा, रणधीर कपूर, नीला, कंचन, शम्मी, संजना, शशि आणि जेनिफर. मध्ये डावीकडून बबिता राजकपूर, कृष्णा, नीतू, राजकपूर यांच्या मांडीवर करीना आणि कृष्णाच्या मांडीवर रिद्धिमा कपूर. खाली डावीकडून राजीव, आदित्य, करीश्मा आणि ऋषि कपूर]

मुंबई: कपूर घराणे भारतीय सिनेसृष्टीतील सर्वात मोठे घराणे आहेत. अभिनय तर या घराण्याच्या रक्तात आहे. याच कारणामुळे भारतीय सिनेसृष्टीच्या सुरुवातीपासून ते आत्तापर्यंत या घराण्याच्या प्रत्येक पीढीने अभिनय क्षेत्रात यशोशिखर गाठले आहे. दिवंगत पृथ्वीराज कपूर यांच्यापासून ते यूथ आयकॉन रणबीर कपूरपर्यंत प्रत्येकाने या क्षेत्रात आपले पाय रोवले आहेत. पृथ्वीराज कपूर यांनी देशाला पहिला बोलपट दिला होता. आज करीना, रणबीर त्यांच्या अभिनयाचा हा वारसा पुढे चालवत आहेत.

पण आता शशी कपूर यांच्या निधनामुळे या घराण्यातील एका पिढीचा अस्त झाला आहे. पृथ्वीराज कपूर यांचे धाकटे चिरंजीव शशी कपूर यांचे 4 डिसेंबर रोजी वयाच्या79 व्या वर्षी निधन झाले. राज कपूर, शम्मी कपूर आणि शशी कपूर हे तीनही भाऊ आता या जगात नाहीत. पण त्यांच्या मुलांनी कलाक्षेत्राचा वारसा जपला आहे.

कपूर घराणे मुळचे पाकिस्तानातील पेशावरमधील आहे. फाळणीनंतर ते भारतात स्थायिक झाले. या कुटुंबात हिंदू, जैन, मुस्लिम आणि ख्रिश्चन धर्मातील लोकांचा समावेश आहे. शशी कपूर यांनी हॉलिवूड अभिनेत्री जेनिफर केंडलसोबत विवाह केला होता. तर त्यांची भाची रीमा कपूरचे लग्न मोहन जैनसोबत झाले आहे. इतकेच नाही तर करीना कपूरचे पती सैफ अली खान पतौडी घराण्याचे नवाब आहे.

या पॅकेजमधून जाणून घेऊयात, कपूर घराण्यातील सदस्यांविषयी... पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या पृथ्वीराज कपूर यांच्या सहा पिढ्यांविषयी...

Next Article

Recommended