आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कधी वडिलांसोबत ज्यूस विकायचे गुलशन कुमार, अशी उभी केली कोट्यवधींची इंडस्ट्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एन्टरटेन्मेंट डेस्कः टी सीरिज या म्युझिक कंपनीचे मालक गुलशन कुमार यांच्या हत्येतील मुख्य आरोपी आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा साथीदार अब्दुल राऊद दाऊद मर्चंटची ढाकाच्या सेंट्रल जेलमधून सुटका झाली आहे. वरिष्ठ तुरुंग अधिक्षक जहांगीर कबीर यांच्या माहितीनुसार, रऊफला रविवारी संध्याकाळी चार वाजता तुरुंगातून सोडण्यात आले. बांग्लादेशचे गृहमंत्री असदुज्जमां खान कमाल यांनी अद्याप रऊफला भारताच्या स्वाधीन करणार की नाही हे स्पष्ट केलेले नाही. रऊफला 2009 साली ब्राह्मनबरियातून बनावट पासपोर्टप्रकरणी अटक करण्यात आली होती. 1997 मध्ये गुलशन कुमार यांची गोळी झाडून केली होती हत्या...
गुलशन कुमार यांचा जन्म 5 मे 1951 रोजी दिल्लीतील एका पंजाबी अरोरा फॅमिलीमध्ये झाला होता. 12 ऑगस्ट 1997 ला मुंबईतील अंधेरी भागातील जीतेश्वर महादेव मंदिरा बाहेर गोळ्यामारुन हत्या करण्यात आली होती. त्यांचे वडील चंद्रभान दुआ दिल्लीतील दरियागंज येथे ज्यूस विक्री करत होते.
गुलशन कुमारांनी कशी सुरु केली म्यूझिक कंपनी
- लहानपणी गुलशकुमार वडिलांच्या दुकानावर ज्यूस विक्रीत त्यांना मदत करत होते. येथूनच त्यांना उद्योगाचे धडे मिळाले आणि त्यातील रस वाढत गेला.
- ते 23 वर्षांचे असताना त्यांनी कुटुंबियांच्या मदतीने एक दुकान खरेदी केले आणि रेकॉर्डर्स आणि ऑडिओ कॅसेट विक्री सुरु केली.
- त्यानंतर पुढे त्यांनी नोएडा येथे स्वतःची कंपनी सुरु केली आणि म्युझिक इंडस्ट्रीमध्ये स्वतःची वेगळी छाप निर्माण केली.
- गुलशन कुमारांनी त्यांच्या कॅसेट बिझनेसला 'सुपर कॅसेट इंडस्ट्रीज लिमिटेड' हे नाव दिले. याच कंपनीला टी-सीरीज नावानेही ओळखले जाते.
- गुलशन कुमारांनी ओरिजनल गाणी दुसऱ्या गायकांच्या आवाजात रेकॉर्ड करुन त्या कॅसेट कमी किंमतीत विक्री करण्यास सुरुवात केली होती.
- इतर कंपन्यांच्या कॅसेट 28 रुपयांमध्ये मिळत असताना, त्याचवेळी 15 ते 18 रुपयात टी-सीरीजची कॅसेट देण्याची किमया त्यांनी केली होती.
- त्याचवेळी त्यांनी भक्ती संगीताकडेही मोर्चा वळवला. देवा-धर्माची गाणी रेकॉर्ड करुन ती त्यांनी प्रसिद्ध केली. काही गाणी ते स्वतः गात होते.
- 70 च्या दशकात गुलशन कुमार यांच्या कॅसेटची डिमांड वाढत गेली आणि म्यूझिक इंडस्ट्रीमध्ये ते यशस्वी बिझनेसमध्ये गणले जाऊ लागले.
- ऑडिओ कॅसेट्समध्ये यशस्वी झाल्यानंतर गुलशन कुमार फिल्म इंडस्ट्रीकडे वळले आणि त्यासाठी ते मुंबईला पोहोचले.
- बॉलिवूडमध्ये बस्तान बसविल्यानंतर ते हिंदू पौराणिक कथांवर आधारित चित्रपट आणि सीरियल्स देखील प्रोड्यूस करु लागले.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, कशी झाली होती गुलशन कुमारांची हत्या...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...