आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओशोंच्या आश्रमात माळी होते विनोद खन्ना, भांडी घासण्यापासून तर टॉयलेट स्वच्छतेचे केले होते काम

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बॉलिवूड अभिनेता विनोद खन्ना यांची आज मुंबईत प्राणज्योत मालवली. ते 70 वर्षांचे होते. गेल्या वर्षभरापासून ते कॅन्सरने आजारी होते. 6 ऑक्टोबर 1946 रोजी पाकिस्तानच्या पेशावरमध्ये जन्मलेल्या विनोद यांच्या आयुष्याची कहाणी एखाद्या सिनेमापेक्षा कमी नव्हती. मध्यमवर्गीय कुटुंबातील विनोद बॉलिवूड अभिनेता होण्यापासून ओशो यांच्याशी प्रभावित होऊन वैवाहिक आयुष्य संपुष्टात आणण्यापर्यंत ते चर्चेत राहिले होते. विनोद खन्ना यांनी ओशोंच्या चरणी जवळपास 5 वर्षे माळी म्हणून काम कले होते. यादरम्यान त्यांना 'सेक्सी संन्यासी'सुध्दा म्हटले गेले होते. 
 
कॉलेजमध्ये पडले होते प्रेमात 
भारत-पाकिस्तानच्या फाळणीनंतर विनोद खन्ना यांचे कुटुंबीय मुंबईला आले होते. त्यांचे वडील टेक्सटाइल बिझनेसमन होते. मुंबई आणि दिल्लीमध्ये शालेय शिक्षण घेतल्यानंतर कॉलेजच्या दिवसांत विनोद इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहत होते. विनोद सायन्सचे विद्यार्थी होते. मात्र त्यांच्या वडिलांची इच्छा होती, की विनोद यांनी कॉमर्समध्ये शिक्षण घ्यावे आणि शिक्षणानंतर घरातील बिझनेसशी जुडावे. विनोद यांच्या सांगण्यानुसार, कॉलेज लाइफमध्ये त्यांनी थिएटरमध्ये काम करण्यास सुरुवात केली. येथेच त्यांनी भेट गितांजलीसोबत झाली. गितांजली विनोद यांची पहिली पत्नी आहेत. कॉलेजपासूनच त्यांची लव्ह-स्टोरी सुरु झाली होती.
 
जेव्हा वडिलांनी दाखवला होता बंदूकीचा धाक
विनोद खन्ना यांनी एका मुलाखतीत सांगितले होते, की एका पार्टीदरम्यान त्यांची भेट सुनील दत्त यांच्याशी झाली. ते एका सिनेमात आपल्या भावाच्या भूमिकेसाठी नवीन चेह-याच्या शोधात होते. त्यांनी विनोद खन्ना यांना ती भूमिका ऑफर केली. मात्र याविषयी जेव्हा विनोद यांच्या वडिलांना माहित झाले तेव्हा त्यांनी विनोद यांना बंदूकीचा धाक दाखवला. त्यांनी सांगितले, की तू सिनेमात काम केलेस मी तुला गोळी मारेल. मात्र विनोद यांच्या आईने वडिलांना समजावले आणि दोन वर्षांची मुदत दिली. वडिलांनी सांगितले, की दोन वर्षांत काहीच करू शकला नाही तर फॅमिली बिझनेस सांभाळायचा.

एका आठवड्यात साइन केले होते 15 सिनेमे
विनोद यांचा 'मन की मीत' हा पहिला सिनेमा होता. सिनेमाला प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिसाद दिला. त्यानंतर एक आठवड्यात विनोद यांनी जवळपास 15 सिनेमे साइन केले. सिनेमांत यश मिळाल्यानंतर विनोद आणि गितांजली यांनी लग्न केले. दोघांना राहूल आणि अक्षय खन्ना ही दोन मुले आहेत.

ओशोंमुळे प्रभावित झाले होते विनोद 
एकेकाळी विनोद खन्ना कुटुंबाला वेळ देण्यासाठी रविवारी काम करत नव्हते. असे करणारे ते शशी कपूर यांच्यानंतरचे दुसरे अभिनेते होते. परंतु ओशोंशी प्रभावित होऊन त्यांनी आपले वैवाहिक आयुष्य उध्वस्त केले. विनोद खन्ना पुण्यात ओशो यांच्या आश्रमात जायचे. इतकेच नव्हे तर त्यांनी आपले अनेक शूटिंग शेड्यूलसुध्दा पुण्यातच ठेवले. डिसेंबर 1957मध्ये विनोद यांनी सिनेमांपासून संन्यास घेण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सर्वांना आश्चर्याचा धक्काच बसला. त्यांना 'सेक्सी संन्यासी'सुध्दा म्हटले जाऊ लागले होते. विनोद अमेरिकेला निघून गेले आणि ओशोंसोबत 5 वर्षे घालवले. तिथे त्यांनी माळीचे काम केले होते.

पहिली पत्नी गितांजलीशी तुटले नाते 
4-5 वर्षे कुटुंबापासून दूर राहिल्यानंतर त्यांचे संपूर्ण कुटुंबीय त्यांच्यापासून दूर गेले. ते भारतात परतल्यानंतर त्यांना पत्नीने घटस्फोट दिला. कुटुंबीय दूर गेल्यानंतर 1987मध्ये विनोद यांनी 'इन्साफ' सिनेमातून पुन्हा बॉलिवूडमध्ये पुनरागमन केले.
 
1990मध्ये केले दुसरे लग्न 
पुन्हा करिअरला सुरुवात केल्यानंतर विनोद यांनी 1990मध्ये कवितासोबत लग्न केले. दोघांना मुलगा साक्षी आणि मुलगी श्रध्दा ही दोन मुले आहेत.
 
1997मध्ये राजकारणात ठेवले पाऊल
1997मध्ये भारतीय जनता पार्टीचे सदस्य बनल्यानंतर विनोद नेतासुध्दा झाले. राजकारणात सक्रिय विनोद खन्ना आता अनेक सिनेमांतसुध्दा दिसतात. सलमान खान स्टारर 'दबंग' सीरिजच्या सिनेमांत त्यांची महत्वपूर्ण भूमिका होती. 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा ओशोंशी प्रभावित झालेल्या विनोद खन्ना यांची निवडक छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...