आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विवाहित बोनी कपूर बघताक्षणीच पडले होते श्रीदेवीच्या प्रेमात, ही आहे \'एका लग्नाची दुसरी गोष्ट\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडची 'हवाहवाई गर्ल' श्रीदेवी आणि निर्माते बोनी कपूर यांच्या लग्नाला 19 वर्षे झाली आहेत. मात्र हे दोघे एकमेकांच्या प्रेमात कसे पडले, यांचे लग्न कसे झाले हे ब-याच जणांना ठाऊक नाहीये. आज श्रीदेवीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही तुम्हाला तिच्या लव्हस्टोरीबद्दल सांगत आहोत.
श्रीदेवीला पाहताच क्षणी बोनी कपूर तिच्या प्रेमात पडले होते. आजही मी तिच्या प्रेमात आकंठ बुडालोय, असं स्वतः बोनी कपूर यांनी काही दिवसांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत सांगितले होते. आणखी काय म्हणाले होते बोनी कपूर, जाणून घ्या त्यांच्याच शब्दांत...
''1970 साली मी श्रीदेवीला एका तामिळ सिनेमात बघितले होते. त्यानंतर मी तिच्याबद्दल अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न सुरु केला. मी श्रीदेवीला भेटण्यासाठी खास चेन्नई येथील तिच्या राहत्या घरी गेलो होतो. मात्र ती शूटिंगच्या निमित्ताने सिंगापूरमध्ये होती. त्यामुळे निराश होऊन मुंबईला परतलो. काही दिवसांनी मी तिचा 'सोल्हवां सावन' (1979) हा सिनेमा बघितला. सिनेमा बघून तिला भेटण्यासाठी मी आतुर झालो होतो. श्रीदेवीने माझ्याबरोबर काम करावे, अशी माझी इच्छा होती.
एके दिवशी तिला भेटण्यासाठी मी तिच्या सेटवर गेलो. श्रीदेवी एक इंट्रोवर्ट स्त्री आहे. ती अनोळखी लोकांशी बोलत नाही. ती माझ्याशी मोडक्या इंग्रजी आणि हिंदीत बोलली. सगळे प्रोफेशनल निर्णय आई घेत असल्याचे श्रीने मला त्यावेळी सांगितले. बोनी मी सिनेमाच्या संदर्भात श्रीच्या आईला भेटलो, तेव्हा 'मिस्टर इंडिया'साठी श्रीदेवीच्या आईने मला दहा लाखांची साईनिंग अमाउंट मागितली. पण मी त्यांना दहाऐवजी अकरा लाख रुपये साईनिंग अमाउंटच्या रुपात दिले. कारण मला श्रीबरोबर मैत्री वाढवायची होती. श्रीची आई माझ्यावर खूप इम्प्रेस होती. श्री त्याकाळातील सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती.
'मि. इंडिया' या सिनेमाच्या निमित्ताने श्रीदेवीबरोबर काम करण्याचे माझे स्वप्न पूर्ण झाले होते. सेटवर तिला कोणत्या गोष्टीचा त्रास होऊ नये, म्हणून मी स्वतः तिच्या सर्व गोष्टींची काळजी घेत होते. त्याकाळी सेलिब्रिटींसाठी व्हॅनिटी व्हॅन नसायच्या. त्यामुळे तिला कोणत्याही गोष्टीचा त्रास होऊ नये म्हणून मी तिच्यासाठी एक वेगळ्या खासगी मेकअप रुमची व्यवस्था केली होती.
श्रीदेवी जेव्हा 'चांदनी' सिनेमाच्या शूटिंगसाठी स्वित्झर्लंडला गेली होती, तेव्हा तिला भेटण्यासाठी मी तेथे गेले होते. कारण मला तिच्यासह जास्तीत जास्त वेळ घालवायचा होता. प्रत्येक भेटीनंतर मी श्रीदेवीकडे आकर्षित होत गेलो. मी त्यावेळी विवाहित होतो.
स्वित्झर्लंडहून परत आल्यानंतर मी माझ्या पहिल्या पत्नीकडे श्रीदेवीच्या प्रेमात पडलो असल्याची कबूली दिली. मी माझ्या पत्नीसमोर कबूल केले की, मी श्रीदेवीच्या प्रेमात पडलोय आणि मला तिच्याबरोबर लग्न करायचे आहे. श्रीसह लग्न करण्यासाठी मी पहिल्या पत्नीला म्हणजे मोनाला घटस्फोट दिला आणि 1996 मध्ये आम्ही दोघे लग्नगाठीत अडकलो.''
श्रीदेवी आणि बोनी कपूर या दाम्पत्याला दोन मुली असून जान्हवी आणि खुशी ही त्यांची नावे आहेत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा श्रीदेवीची पती आणि दोन्ही मुलींसोबतची खास छायाचित्रे...