आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्क्रिनटेस्टमध्ये फेल झाल्यानंतर करत होते इंश्योरेन्स, पाहा अमरिश यांचे 15 Rare फोटो

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलांसोबत मस्तीच्या मूडमध्ये अमरीश पूरी, उजवीकडे पत्नी उर्मिला, मुलगा राजीव आणि मुलगी नम्रतासोबत. - Divya Marathi
मुलांसोबत मस्तीच्या मूडमध्ये अमरीश पूरी, उजवीकडे पत्नी उर्मिला, मुलगा राजीव आणि मुलगी नम्रतासोबत.
एंटरटेन्मेंट डेस्क: 'मोगॅम्बो खुश हुआ'... 'मि. इंडिया' सिनेमातील हा डायलॉग आजही कुठे ऐकायला आला तर डोळ्यासमोर अमरीश पूरी यांचे प्रतिमा उभी राहते. बॉलिवूडचा हा महान खलनायक आज जगात नाही, परंतु त्यांचे डायलॉग आजसुध्दा लोकांच्या तोंडून ऐकायला मिळते. बॉलिवूड अभिनेता अमरीश पूरी आज आपल्यात असते तर 84 वर्षांचे झाले असते.
22 जून 1932ला लाहोर, पंजाबमध्ये (आता पाकिस्तान) जन्मलेल्या अमरीश यांचे 12 जानेवारी 2005मध्ये ब्रेन हॅमरेजने निधन झाले. त्यांचे निधन मुंबईमध्ये झाले होते. जेव्हा त्यांचे निधन झाले तेव्हा वर्तमानपत्रात 'मोगॅम्बो खामोश हुआ' हेडलाइन आल्या होत्या. त्यांच्या निधनाने फिल्म इंडस्ट्रीच नव्हे तर सामान्य लोक आणि त्यांच्या चाहत्यांनीसुध्दा हळहळ व्यक्त केली होती.
स्क्रिनटेस्टमध्ये अपयशी झाल्यानंतर केले इंश्योरेन्स कंपनीत काम...
अमरीश पूरी यांना मोठे भाऊ असून त्यांची नावे मदन आणि चमन पूरी आहेत. दोघेही अमरीश यांच्यापूर्वी अभिनयात सक्रिय होते. मात्र अमरीश यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. पहिल्या स्क्रिन टेस्टमध्ये अपयशी झाल्यांतर त्यांनी एम्प्लाइज स्टेट इंश्योरेन्स कॉर्पोरेशनमध्ये काम केले.
मराठी सिनेमांत मिळाली होती पहिली भूमिका...
क्वचितच लोकांना ठाऊक असेल, की अमरीश पूरी यांनी फिल्मी करिअरची सुरुवात मराठी सिनेमातून केली होती. 1967मध्ये आलेल्या 'शंतुत! कोर्ट चालू आहे' या मराठी सिनेमात त्यांना पहिली भूमिका मिळाली होती. या सिनेमात अमरिश यांनी एका अंध व्यक्तीचे पात्र साकारले होते. तो रेल्वे कम्पार्टमेंटमध्ये गाणे गात होता.
वयाच्या 39व्या वर्षी मिळाला बॉलिवूडमध्ये रोल...
अमरीश पूरी यांना बॉलिवूडमध्ये पहिली भूमिका वयाच्या 39व्या वर्षी मिळाली होती. सुनील दत्त आणि वहीदा रहमान स्टारर 'रेशमा और शेरा' सिनेमात त्यांनी रहमत खान नावाच्या व्यक्तीचे पात्र साकारले होते.
'इंडियाना जोन्स...'साठी पहिल्यांदा केले टक्कल...
अमरीश पूरी यांचा बाल्ड लूक अनेक सिनेमांत पाहायला मिळाला. परंतु त्यांनी 'इंडियाना जोन्स एंड द टेंपल ऑफ डूम' या हॉलिवूड सिनेमासाठी पहिल्यांदा टक्कल केले होते. या सिनेमात त्यांनी मोला रामची भूमिका केली होती.
हॅटची होती पॅशन...
अमरीश पूरी यांना हॅटची पॅशन होती. त्यांच्या कलेक्शनमध्ये 200पेक्षा जास्त भारतीय आणि परदेशी हॅट होत्या.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अमरीश पूरी यांचे Rare Photos...
बातम्या आणखी आहेत...