Home »Flashback» Jayalalithas First Death Anniversary

18 UNSEEN PHOTOS : जयललितांना बनायचे होते वकील, नाईलाजाने आल्या होत्या सिनेसृष्टीत

दिव्य मराठी वेब टीम | Dec 06, 2017, 15:17 PM IST


दाक्षिणात्य अभिनेत्री आणि तमिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांना या जगाचा निरोप घेऊन 5 डिसेंबर रोजी एक वर्ष लोटले. 5 डिसेंबर 2016 रोजी त्यांनी या जगाचा कायमचा निरोप घेतला. 24 फेब्रुवारी 1948 रोजी त्यांचा जन्म मेलुकोट, कर्नाटकमध्ये झाला होता. कोमलावल्ली हे त्यांचे खरे नाव होते.


दोन वर्षांच्या असताना गमावले वडिलांना...
जेव्हा जयललिता यांच्या वडिलांचे निधन झाले, त्यावेळी त्या अवघ्या 2 दोन वर्षांच्या होत्या. त्यांची संपूर्ण संपत्ती सावत्र आईला मिळाली आणि जयललितांची आई वेदावल्ली (चित्रपटात आल्यानंतरच्या संध्या) यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली. त्यावेळी जयललितांना बेंगळुरूमध्ये बहिणीकडे सोडून त्यांची आई कामाच्या शोधात म्हैसूरहून मद्रासला गेली. जयललितांना कधीही चित्रपटात येण्याची इच्छा नव्हती. पण नाइलाजाने त्यांना चित्रपटांत यावे लागले.


या पॅकेजमधून जाणून घेऊयात, जयललिता यांच्या आयुष्याविषयी आणि सोबतच बघा, चित्रपटसृष्टीत कार्यरत असतानाची दुर्मिळ छायाचित्रे...

Next Article

Recommended