आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Jayaprada Birthday Special: Now Actress Busy In Politics

B\'day: तीन मुलांच्या वडिलांसोबत केले जयाप्रदांनी लग्न, दोनदा केलाय आत्महत्येचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(जया प्रदा आणि त्यांचे पती श्रीकांत नाहटा)
मुंबईः बॉलिवूड अभिनेत्री आणि राजकारणातील सशक्त स्त्री म्हणून ओळखल्या जाणा-या जयाप्रदा यांनी आज वयाची 53 वर्षे पूर्ण केली आहेत. जयाप्रदा यांचा जन्म 3 एप्रिल 1962 रोजी आंध्र प्रदेशातील राजमुंदरी येथे झाला. त्यांनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात तेलगू सिनेमाद्वारे केली होती. मात्र बॉलिवूड सिनेमांमुळे त्यांना खरी ओळख प्राप्त झाली. सिनेमासोबतच राजकारणातदेखील त्यांनी नाव कमावले. तेलगू देशम पक्षाद्वारे त्यांनी राजकारणात प्रवेश केला. सध्या त्या राष्ट्रीय लोकदल पक्षात काम करत आहेत.
पहिल्या सिनेमासाठी मिळाले होते 10 रुपये मानधन
वयाच्या 14 व्या वर्षी जयाप्रदा यांना आपल्या शाळेतील डान्स प्रोग्राममध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती. त्यांचे नृत्य बघून एक दिग्दर्शक प्रभावित झाले होते. त्यांनी भूमिकोसम या सिनेमात त्यांना नृत्य सादर करण्याची ऑफर दिली. मात्र त्यांनी ही ऑफर स्वीकारली नाही. त्यानंतर आईवडिलांच्या म्हणण्यावरुन त्यांनी ही ऑफर स्वीकारली. या सिनेमासाठी जयाप्रदा यांना केवळ 10 रुपये मानधन मिळाले होते.
फिल्मी करिअर
1979 हे वर्ष जयाप्रदा यांच्या करिअरसाठी खूप खास राहिले. 1979 मध्ये आलेल्या 'श्री श्री मुवा' या सिनेमाचा हिंदी रिमेक असलेल्या 'सरगम' या सिनेमाद्वारे त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केले. या सिनेमाला मिळालेल्या यशामुळे जयाप्रदा यांना एका रात्रीत स्टारडम मिळाले. त्यानंतर मात्र रिलीज झालेले काही सिनेमे बॉक्स ऑफिसवर फारशी कमाल दाखवू शकले नाहीत. कामचोर या सिनेमाच्या माध्यमातून पुन्हा एकदा त्यांना नशीबाने साथ दिली. हा सिनेमा यशस्वी ठरला.
बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींमध्ये जयाप्रदा यांची गणना व्हायची. अमिताभ बच्चन, जितेंद्र यांच्यासोबतची त्यांची जोडी चांगली गाजली.
विवाहित व्यक्तीसोबत थाटले लग्न
जयाप्रदा यांनी विवाहित श्रीकांत नाहटा नावाच्या व्यक्तीशी लग्न केले. श्रीकांत नाहटा हे निर्माते आहेत. जयाप्रदा यांच्याशी लग्न करताना श्रीकांत नाहटा तीन मुलांचे वडील होते. जयाप्रदासोबत लग्न करण्यापूर्वी त्यांनी आपल्या पहिल्या पत्नीला घटस्फोटदेखील दिला नव्हता. जयाप्रदा यांचे हे पहिलेच लग्न आहे. यांच्या लग्नावरुन बराच वाददेखील निर्माण झाला होता. लग्नानंतर जयाप्रदा यांनी बाळाला जन्म दिला नाही. त्यांच्या वैवाहिक आयुष्यात मतभेददेखील निर्माण झाले होते. जयाप्रदा यांनी दोनदा आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे म्हटले जाते.
चर्चेत राहिले राजकारणातील करिअर
सिनेमात उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखल्या जाणा-या जयाप्रदा यांचा राजकारणातील प्रवेशदेखील चर्चेत राहिला. आपल्या पक्षातील नेत्यावर आरोप लावल्याने त्या चर्चेत आल्या होत्या.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, जया प्रदा यांची खास छायाचित्रे...