आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किशोर दांची तिसरी पत्नी योगिता बाली आहे मिथून दांची पत्नी, दोन वर्षांतच झाला होता घटस्फोट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडे - तिसरी पत्नी योगिता बालीसोबत किशोर कुमार, उजवीकडे - मिथून चक्रवर्ती आणि दोन मुलांसोबत योगिता बाली - Divya Marathi
डावीकडे - तिसरी पत्नी योगिता बालीसोबत किशोर कुमार, उजवीकडे - मिथून चक्रवर्ती आणि दोन मुलांसोबत योगिता बाली
आपल्या सुमधूर आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे महान गायक किशोर कुमार यांचा आज जन्मदिवस. गायनासोबतच त्यांनी त्यांच्या अभिनयानेही अनेकांना खिळवून ठेवले. किशोर दा करिअरमध्ये जेवढे यशस्वी ठरले, तेवढेच त्यांचे वैयक्तिक आयुष्यही चांगलेच गाजले. त्यांनी आपल्या आयुष्यात दोनदा किंवा तीनदा नव्हे तर तब्बल चार वेळा लग्न केले. रुमा घोष, मधुबाला, योगिता बाली आणि लीना चंद्रावरकर ही त्यांच्या चारही पत्नींची नावे आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या चारही पत्नी सिनेसृष्टीत कार्यरत होत्या. त्यांची तिसरी पत्नी योगिता बाली हिने त्यांच्यापासून घटस्फोट घेऊन बॉलिवूडचे डिस्को डान्सर मिथून चक्रवर्तींसोबत दुसरा संसार थाटला. योगिता आणि मिथून यांना एकुण चार अपत्ये आहेत. मिमोह चक्रवर्ती हा त्यांचाच मुलगा आहे.
एक नजर टाकुया किशोर कुमार यांच्या वैवाहिक आयुष्यावर, जाणून घ्या कुणासोबत किती वर्षे टिकला होता त्यांचा संसार...