आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'Anniv: अर्ध्या पैशांत अर्धवटच काम करायचे किशोर दा, जाणून घ्या आयुष्यातील 9 रंजक किस्से

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः किशोर कुमार जेवढे त्यांच्या टॅलेंटसाठी ओळखले जातात, तेवढेच ते त्यांच्या खासगी आयुष्यासाठीही. आपल्या गायन आणि अभिनय कौशल्याच्या बळावर त्यांनी हिंदी सिनेसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. पार्श्वगायक आणि अभिनेत्याबरोबरच किशोर कुमार दिग्दर्शक, निर्माता आणि स्क्रिप्ट रायटरसुद्धा होते. खरं तर किशोर कुमार पैशांसाठी काम करतात, अशीच त्यांची ओळख निर्माण झाली होती. जेव्हा त्यांना पैसे मिळत नव्हते, तेव्हा ते गाण्याचे रेकॉर्डिंग करत नसे. फक्त गायनातच नव्हे तर अभिनयाच्या बाबतीतही ते असेच वागायचे. त्यांच्या अशा वागण्यामुळे अनेक निर्माते त्यांच्यासोबत काम करण्यास घाबरायचे.
4 ऑगस्ट 1929 रोजी खंडवा (मध्यप्रदेश) येथे जन्मलेल्या किशोर दांनी 13 ऑक्टोबर 1987 रोजी या जगाचा कायमचा निरोप घेतला. आज ते आपल्यात असते तर त्यांनी वयाची 86 वर्षे पूर्ण केली असती. किशोर दांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत आम्ही तुम्हाला त्यांच्या आयुष्याशी निगडीत काही रंजक गोष्टी सांगत आहोत...
किस्सा नंबर 1 : अर्धे पैसे-अर्धवट काम
किशोर कुमार यांच्याबाबतीत घडलेला एक किस्सा... एकदा किशोर कुमार एका सिनेमाचे शूटिंग करत होते. या सिनेमासाठी निर्मात्यांनी त्यांना अर्धेच पैसे दिले होते. खिन्न झालेले किशोर कुमार सिनेमाच्या सेटवर अर्धवट मेकअपमध्ये पोहोचले. तेव्हा दिग्दर्शकांनी त्यांना पूर्ण मेकअप करण्यासाठी सांगितले. तेव्हा किशोर कुमार म्हणाले, 'आधा पैसा, आधा काम। पूरा पैसा, पूरा काम'. किशोर कुमार यांच्या अशा स्वभावामुळे निर्माते-दिग्दर्शक त्यांच्याबरोबर काम करण्यास बिचकत होते.
किस्सा नंबर 2 : तलवारांच्या घरासमोर बसायचे ठाण मांडून
पैशांच्या बाबतीत किशोर कुमार यांच्याशी संबंधित आणखी एक मजेशीर किस्सा आहे. एकदा ते चित्रपट निर्माते आर. सी. तलवार यांच्याबरोबर काम करत होते. मात्र या सिनेमासाठीसुद्धा आर. सी तलवार यांनी त्यांना अर्धेच पैसे दिले होते. त्यामुळे किशोर कुमार रोज सकाळी त्यांच्या घरासमोर जाऊन बसायचे आणि तलवार यांना बघून ओरडून म्हणायचे, 'हे तलवार, दे दे मेरे आठ हजार... हे तलवार, दे दे मेरे आठ हजार...'.
पुढील स्लाईड्समध्ये जाणून घ्या किशोर दांविषयीच्या आणखी काही रंजक गोष्टी...