आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...जेव्हा सेटवर अर्धी मिशी आणि दाढीमध्ये आले, असे होते किशोर कुमार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
किशोर कुमार मधुबाला आणि मुलगा अमित कुमारसोबत - Divya Marathi
किशोर कुमार मधुबाला आणि मुलगा अमित कुमारसोबत
मुंबई: किशोर कुमार असे व्यक्तिमत्व आहे, ज्यांना एका वाक्यात सांगणे कठिण आहे. त्यांचे नाव घेताच अनेक गोष्टी समोर येतात. त्यांचा अनोख्या गोष्टी. त्यांचे अनेक किस्से आहेत, त्यातील सत्य किती आणि काल्पनिक किती हे माहित नाही. 4 ऑगस्टला त्यांच्या वाढदिवसानिमित्त लेखक दिलीप ठाकुर यांनी अनेक गोष्टी सांगितल्या.
एकदा किशोर दा त्यांच्या एका सिनेमाच्या शूटिंगसाठी अर्धी दाढी आणि अर्धी मिशीमध्ये पोहोचले होते. दिग्दर्शकाने विचारले, की हे काय आहे? किशोर दा यांनी लगेच उत्तर दिले, 'निर्मात्यांनी मला अर्धेच पैसे दिले आहेत. म्हणून मी अर्धी दाढी आणि अर्धी मिशीमध्ये आलोय. जेव्हा ते पूर्ण पैसे देतील तेव्हाच मी पूर्ण दाढी आणि मिशीमध्ये येईल.'
जेव्हा नाही उचलला दिग्दर्शकाचा फोन...
दिग्दर्शक कालिदास यांच्या 'हाफ तिकीट' सिनेमाच्या सेटवर किशोर कुमार हे बराचवेळ पोहोचले नहाही. म्हणून कालिदास यांनी त्यांच्या घरी फोन लावला. वारंवार फोन करूनही त्यांना काही प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर ते किशोर कुमार यांच्या घरी म्हणजेच गौरीकुंजमध्ये गेले. तिथे गेल्यानंतर त्यांनी पाहिले, की किशोर कुमार घरीच होते आणि त्यांचा फोनही चालू होता. तरीदेखील त्यांनी फोन का नाही उचलला? यावर किशोर दा त्यांच्या स्टाइलमध्ये म्हणाले, 'हा फोन येणारे कॉल उचलण्यासाठी नाहीये.'
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या किशोर कुमार यांच्याशी संबंधित रंजक गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...