आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेटवर सिगारेट ओढायची दिव्या भारती, वाचा मृत्यूनंतर अर्धवट राहिलेल्या सिनेमांचे काय झाले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोणाचा कधी मृत्‍यू होईल हे सांगता येत नाही. मात्र सिनेमाक्षेत्रात काम करणाऱ्या प्रतिथयश अभिनेता किंवा अभिनेत्रीच्‍या मृत्‍यूमूळे अनेक प्रश्‍न निर्माण होतात. त्‍यांच्‍या ज्‍या सिनेमांचे शूटिंग चालू आहे, त्‍या सिनेमांचे भविष्‍य काय असेल? निर्माता-दिग्‍दर्शक यांना अशावेळी काहीच सूचेनासे होते. ओम पुरी यांचे नुकतेच दु:खद निधन झाले. काही दिवसांपूर्वीच त्‍यांनी रामगोपाल वर्मा यांच्‍या 'सरकार राज 3' सिनेमाचे अमिताभ बच्‍चन यांच्‍यासोबतचे शूटिंग पूर्ण केले होते. मात्र असे झाले नसते तर दिग्‍दर्शकाला काय करावे लागले असते याचा विचार करुन पहा? सुदैवाने राम गोपाल वर्मा यांच्‍या या सिनेमाचे फक्‍त शेवटच्‍या काही दृश्‍यांचे शूटिंग बाकी होते. जर ओम पूरी हे शूटिंग पूर्ण करु शकले नसते, तर पटकथेमध्‍ये बदल करावा लागला असता किंवा एखाद्या डुप्‍लिकेट आर्टिस्‍टला पाठमोरे दाखवून ओम पुरींचा फिल द्यावा लागला असता. मात्र ज्‍या सिनेमांचे शूटिंग अर्धे किंवा त्‍यापेक्षा अधिक झाले आहे, त्‍यांचे काय? सिनेक्षेत्रासाठी ही नविन गोष्‍ट नाही. मात्र असे झाल्‍याने त्‍या सिनेमाला व त्‍याच्‍याशी सं‍बंधित व्‍यक्तिंना बराच त्रास सहन करावा लागतो. 
 
सेटवर सर्वांसमोर सिगारेट ओढायची दिव्या भारती... 
दिव्‍या भारती यांचा मृत्‍यू पूर्ण सिनेक्षेत्राला एक मोठा धक्‍का होता. ती झपाटयाने लोकप्रियतेच्‍या शिखरावर पाहोचली होती. यासोबतच ती बोल्‍डही होती. 'बलवान' सिनेमाच्‍या सेटवर शॉट पूर्ण होताच ती सर्वांदेखत सिगरेट पित असे. चोवीस वर्षापूर्वी एखाद्या अभिनेत्रीचे अशा पध्‍दतीने सिगरेट पिणे ही साधी गोष्‍ट नव्‍हती. दिव्‍या भारतीचा मृत्‍यू झाला तेव्‍हा 'रंग' सिनेमाच्‍या एका गाण्‍याचे शूटिंग बाकी होते. कमल सदनाह सोबत एक डुप्‍लीकेट डान्‍सर घेऊन कॅमेराचा चलाखीने वापर करत ते शूटिंग पूर्ण करण्‍यात आले.
 
रविना टंडन आणि श्रीदेवी यांनी केले दिव्या भारतीच्या सिनेमांत काम...
3 सिनेमांना दिव्‍या भारतीसोबत झालेले शूटिंग रद्द करावे लागले होते. या सिनेमांचे 20 टक्‍के शूटिंग पूर्ण झाले होते. त्‍यानंतर नव्‍या अभिनेत्रींसोबत ते सिनेमे पूर्ण करावे लागले. ते सिनेमे होते 'लाडला' (श्रीदेवी), मोहरा (रविना टंडन) आणि 'कर्तव्य'  (जुही चावला). या सिनेमांचे 20 टक्‍केच शूटिंग पूर्ण झाल्‍यामूळे यांना जास्‍त आर्थिक नुकसान सहन करावे लागले नाही. मात्र 'शतरंज' सिनेमाचे 20 टक्‍केच शूटिंग बाकी होते. अशा परिस्थित निर्मात्‍यांना कोणताच मार्ग सूचत नाही. बाकीचे कलाकारही त्‍यांच्‍या इतर सिनेमांमध्‍ये व्‍यस्‍त होतात. पुन्‍हा त्‍यांच्‍या तारखा मिळविणे अवघड होऊन जाते. 
कलाकारांच्‍या अचानक निधनानंतर त्‍यांच्‍या सिनेमांचे पूर्ण होणे ही एक प्रचंड कठिण गोष्‍ट बनते. यासाठी दुसरा उपायही नाही. अमजद खानपासून अनेक कलाकांरांच्‍या बाबतीत हे घडलेले आहे. त्‍यांच्‍या निधनानंतर त्‍यांच्‍या सिनेमांचे भवितव्‍य काय असेल किंवा त्‍यांना काही भवितव्‍य आहे का? असे अनेक प्रश्‍न आवासून उभे राहतात. 
 
दिव्या भारतीप्रमाणेच मीना कुमारी, संजीव कुमार, विनोद मेहरा, स्मिता पाटील या कलाकारांचा अकस्‍मात मृत्‍यू झाला आणि पुढे त्‍यांच्या अर्धवट राहिलेले सिनेमांचे काय झाले, वाचा पुढील स्लाईड्सवर.... 
बातम्या आणखी आहेत...