आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाचा, माधुरी दिक्षीतचा कसा झाला Accident? ’ हमको आज कल हैं’ गाण्यावर नाचताना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माधुरी दिक्षीत एक चांगली अभिनेत्रीच नाही. तर ती एक उत्तम डान्सर आहे. तिच्या ‘हम को आज कल हैं’, ‘एक दो तीन’, ‘धक धक करने लगा’ अशा गेल्या २५ वर्षांतल्या कित्येक गाण्यांनी तिच्या चाहत्यांना वेडं केलंय. आज बॉलीवूडच्या कोणत्याही नवोदित अभिनेत्रीला विचारलं की, तुझी आयडल कोण? तर ब-याचदा उत्तर माधुरीच येतं.
पण ह्या ‘डान्सिंग दिवा’ माधुरीला कधीकाळी बॉलीवूड गाण्यांची भीती वाटायची. तिला नाचताच यायचं नाही. विश्वास बसत नाहीये, ना.. मग ऐका खुद्द माधुरी दिक्षीत कडूनच.
माधुरी दिक्षीत आपल्या करीयरच्या सुरूवातीच्या काळातल्या आठवणी जागवताना म्हणते, ”जेव्हा मी ‘उत्तर दक्षिण’ ही फिल्म करत होते. तेव्हा मला नाचायचं टेन्शनच आलं होतं. मी कथ्थक नृत्याचे ध़डे गिरवलेत. पण शास्त्रीय नृत्य आणि बॉलीवूड डान्स ह्यात जमीन-आसमानाचा फरक आहे. पण त्या चित्रपटातल्या गाण्यांच्या नृत्यदिग्दर्शिका सरोज खान मला म्हणाल्या ‘बॉलीवूड फिल्म करायचीय, तर बॉलीवूड स्टाइलचा डान्स करायलाही शिकावंच लागेल’. त्यानंतरच्या ‘तेजाब’ चित्रपटालाही त्यांनीच नृत्यदिग्दर्शन केलं. तेव्हा तर अक्षरश: जोपर्यंत मला व्यवस्थित ‘एक दो तीन’ ह्या गाण्यावर नाचता येत नव्हतं. तोपर्यंत त्यांनी शुटिंग केलं नाही.”
तेजाबनंतर माधुरीची ‘सैलाब’ रिलीज झाली. तेव्हा तर माधुरीचा नाचता-नाचता कपाळमोक्ष होणंच काय ते बाकी राहिलं होतं. ती आपल्या एक्सिडेंटबद्दल सांगताना म्हणते, “गाण्याच्या सुरूवातीला दिसणा-या मादक अदा तर माझ्यासाठी खूप कठीण होत्या. त्यानंतर मला नाचायचंही होतं. ते ही माझ्यासाठी थोडं कठीण होतं. आम्ही रिहर्सल करत होतो. आणि रिहर्सल करताना मी धाडकन पडले. आणि माझ्या कपाळावर मोठं टेंगुळ आलं होतं.”
पण आज मात्र माधुरी बॉलीवूड डान्सिंगमध्ये एक आयकॉन आहे. आता तिने स्वत:चा डान्स स्टुडियोही सुरू केलाय. आता बॉलीवूड एक्टरेसच नाहीत तर तिची मुलंही तिच्यासारखी नाचायचा प्रयत्न करतात. ती सांगते, “मला टीव्हीवर किंवा सिल्व्हर स्क्रिनवर नाचताना माझी दोन्ही मुलं पाहतात. आणि माझ्यासारखं नाचायचा प्रयत्न करतात. आणि नाही जमलं तर, हे कसं करायचं असा प्रश्नही विचारतात.”
माधुरी आता बॉलीवूड डान्सिंगमध्ये मास्टर झाली असली तरीही तिला प्रभुदेवासोबत नाचताना अजूनही कापरं भरतं. ती म्हणते,” मी कोणत्याही बॉलीवूड एक्टरसोबत नाचताना एकदम कॉन्फिडन्ट असते. फक्त प्रभुदेवा आला की, मला टेन्शन येतं. त्याच्यासोबत स्टेप्स करणं खूप कठीण आहे. जेव्हा मी आणि त्याने ‘के सरा सरा’वर डान्स केला होता, तेव्हाही भीती वाटायची. आणि आजही भीतीच वाटते.”
पुढील स्लाइडमध्ये पाहा, माधुरी दिक्षीतचे 'सैलाब' चित्रपटातल्या 'हमको आज कल है', गाण्याचे फोटो