आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Many Cricket And Bollywood Star Have Attended Funeral Procession Of Nawab Pataudi

नवाब पतौडी यांना अखेरचा निरोप द्यायला पोहोचले होते बॉलिवूड आणि क्रिकेट विश्वातील मान्यवर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवाब पतौडी यांच्या अंत्य संस्कारावेळी त्यांचा मुलगा सैफ अली खान आणि मुलगी सोहा अली खान. इनसेटमध्ये नवाब पतौडी - Divya Marathi
नवाब पतौडी यांच्या अंत्य संस्कारावेळी त्यांचा मुलगा सैफ अली खान आणि मुलगी सोहा अली खान. इनसेटमध्ये नवाब पतौडी
भोपाळः भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि पतौडीचे नववे नवाब मन्सूर अली खान पतौडी यांची आज पुण्यतिथी आहे. चार वर्षांपूर्वी फुफ्फुसाच्या आजारामुळे त्यांची प्राणज्योत मालवली होती. त्यांचा जन्म भोपाळ येथे झाला होता. त्यांच्या आई साजिदा सुल्तान भोपाळ नवाबांच्या कन्या होत्या. लग्नानंतर पत्नी शर्मिला टागोर आणि मुलगा सैफ अली खानसोबत ते भोपाळ येथे काही वर्षे ते वास्तव्याला होते.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात नवाब पतौडी यांचे नाव गौरवास्पद कामगिरीसाठी घेतले जाते. 1967 साली त्यांच्या नेतृत्त्वाखाली भारताना न्यूझीलंडविरुद्ध विदेशी भूमीवर सर्वप्रथम टेस्ट सिरीज जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी बजावली होती. 1961 ते 1975 याकाळात ते भारतासाठी 46 कसोटी सामने खेळले. त्यापैकी 40 टेस्टमध्ये त्यांनी भारताचे नेतृत्त्व केले होते. भारतीय संघाकडून खेळताना 46 कसोटींमध्ये त्यांनी 2793 धावा केल्या. त्यामध्ये 203 या सर्वोच्च धावा आहेत. त्यांनी सहा शतके आणि 16 अर्धशतके झळकाविली होती.
क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केल्यानंतर वयाच्या 20 व्या वर्षी त्यांच्या गाडीला अपघात झाला होता. या अपघातात त्यांना आपल्या उजव्या डोळ्याची दृष्टी कायमची गमवावी लागली होती. मात्र तरीही क्रिकेट कारकिर्दीवर त्याचा काहीही परिणा झाला नव्हता. क्रिकेटच नव्हे तर राजकारणातही ते सक्रिय होते. राजीव गांधी यांच्या सल्ल्यावरुन त्यांनी भोपाळहून लोकसभा निवडणूक लढवली होती.
त्यांच्या निधनानंतर त्यांना अखेरचा निरोप द्यायला बॉलिवूड, क्रिकेट आणि राजकारणातील अनेक मान्यवर पोहोचले होते. दिल्लीजवळील त्यांच्या वडिलोपार्जित गावात त्यांना सुपुर्द-ए-खाक करण्यात आले होते. त्यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा सैफ अली खानला पतौडीचा दहावा नवाब बनवण्यात आले.
शर्मिला टागोर यांच्यासोबत विवाह
मन्सूर अली खान पतौडी यांनी 1969 मध्ये बॉलिवूडमधील ख्यातनाम अभिनेत्री शर्मिला टागोर यांच्याशी विवाह केला होता. त्यांचा पुत्र सैफ अली खान आणि कन्या सोहा अली खान बॉलिवूडमधील सध्याचे नावाजलेले नायक-नायिका आहेत. तर दुसरी कन्या सबा ही ज्वेलरी डिझायनर आहे.
हे आहे नवाब पतौडी यांचे क्रिकेट करिअर
टेस्ट मॅच : 46
रन : 2793
अॅव्हरेज : 34.91
100/50 : 6/17
सर्वोत्कृष्ट : 203
पुढे पाहा, नवाब पतौडी यांच्या अंत्य संस्काराची छायाचित्रे...