आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशी दिसत होती बिग बींची ऑनस्क्रिन आई, केल्या होत्या द्रौपदी-पार्वतीच्या भूमिका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो : निरूपा राय - Divya Marathi
फाइल फोटो : निरूपा राय
मुंबई- रुपेरी पडद्यावर अनेकदा अमिताभ बच्चन यांची आईच्या भूमिकेत दिसलेल्या निरूपा राय आज हयात असत्या तर 84 वर्षांच्या झाल्या असता. 4 जानेवारी 1931ला गुजरातच्या वलसाडच्या एका माध्यमवर्गीय कुटुंबात जन्ममेल्या निरूपा राय यांची गणती बॉलिवूडच्या सर्वोत्कृष्ण कलाकारांमध्ये सामील होत्या. पाच दशकांच्या करिअरमध्ये त्यांनी 275 सिनेमांत काम केले होते.
कधी बनल्या पार्वती तर कधी साकारले द्रौपदीचे पात्र-
निरूपा यांनी आपल्या करिअरची सुरुवात 1946मध्ये आलेल्या 'गणसुंदरी' या गुजराती सिनेमातून केली. परंतु 'हमारी मंजिल' त्यांचा पहिला हिंदी सिनेमा होता. 1951मध्ये आलेल्या 'हर हर महादेव'मधील त्यांच्या पार्वतीच्या भूमिकेने खूप प्रशंसा मिळवली आणि त्यानंतर त्या 'वीर भीमसेन'मध्ये द्रौपदीच्या भूमिकेत दिसल्या होत्या. या भूमिकेनेदेखील लोकांना भूरळ घातली. सुरुवातीच्या काळात त्यांनी सिनेमांत देवींच्या भूमिका साकारल्या आणि ओळख मिळवली.
'सिंदबाद : दी सेलर'मध्ये केली तलवारबाजी-
1951मध्ये आलेल्या 'सिंदबाद : दी सेलर' सिनेमात त्यांनी तलवारबाजी आणि मारहाण करणा-या तरुणीची भूमिका मिळाली. 50 आणि 60च्या दशकात निरूपा यांनी सर्वाधिक धार्मिक सिनेमांतच काम केले. 1953मध्ये रिलीज झालेला बिमल राय यांचा 'दोन बीघा जमीन' सिनेमा मैलाचा दगड ठरला.
बिग बी यांनी ऑनस्क्रिन आई-
1975 मध्ये रिलीज झालेल्या 'दीवार' सिनेमात निरूपा यांचा सर्वात खास सिनेमांपैकी एक आहे. यश चोप्रा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेल्या या सिनेमात त्यांनी शशि कपूर आणि अमिताभ बच्चन यांच्या आईची भूमिका साकारली होती.
पुढे चालून त्यांनी प्रतिमा बिग बींच्या आईच्या रुपात झाली. यांच्या या भूमिकांची खूप प्रशंसा झाली. त्यानंतर त्यांनी ‘खून पसीना’, ‘मुकद्दर का सिकंदर’, ‘अमर अकबर अँथोनी’, ‘सुहाग’, ‘इंकलाब’, ‘गिरफ्तार’, ‘मर्द’ आणि ‘गंगा-जमुना-सरस्वती’सारख्या सिनेमांतसुध्दा अमिताभ यांच्या आईची भूमिका साकारली.
2014मध्ये झाले निधन-
नव्वद दशकात रिलीज झालेल्या 'लाल बादशाह' सिनेमात त्या शेवटच्या दिसल्या होत्या. या सिनेमातही त्या अमिताभ बच्चन यांच्या आईच्या भूमिकेत होत्या. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणा-या निरूपा राय यांचे 13 ऑक्टोबर 2004मध्ये निधन झाले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा निरूपा राय यांची न पाहिलेली छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...